श्रीराम मंदिर संस्थानतर्फे श्रीराम वहनोत्सव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 7 नोव्हेंबर - ‘दिशा दिशातून चैतन्याचे वारे हे फिरती। मूर्ती मूर्तीतील कीर्तीवंत वहने घरोघरी येती॥’ असे वर्णन केले जाणार्‍या जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्यावतीने कार्तिकी प्रबोधिनी एकादशीनिमित्त आयोजित श्रीराम वहनोत्सवास गुरुवार, 8 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. कार्तिक शुक्ल प्रबोधिनी एकादशी सोमवार, 19 रोजी श्रीराम रथोत्सव आहे.
 
संपूर्ण भारतात कार्तिकी प्रबोधिनी एकादशीस प्रभू श्रीरामांचा संपन्न होणारा जळगावचा रथ एकमेव आहे. संत अप्पा महाराज यांनी 1872 मध्ये सुरु केलेल्या रथवहनोत्सवाचे यंदा 146 वे वर्ष आहे.
 
वहनोत्सवातील पहिले वहन घोडा आहे. सायंकाळी सहा वाजता श्रीराम मंदिर संस्थानच्या प्रांगणात संस्थानचे प्रमुख विश्वस्त, गादीपती ह.भ.प. मंगेश महाराज यांच्या हस्ते वहन पुजन होईल. यावेळी शहरातील ब्रह्मवृदं वेदमंत्रांचे पठण करणार आहे.
 
रथोत्सवाचे मानकरी, सेवेकरी व शहरातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहील. सायंकाळी सात वाजता वहन मिरवणूक निघेल. सर्वात पुढे वाजंत्री, त्यानंतर भगवा ध्वज, श्री संत मुक्ताबाई राम पालखी, विविध भजनी मंडळे असतील.
 
 
उत्सवात दैनंदिन कार्यक्रम
 
कार्तिक शु. प्रतिपदा ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे पाच वाजता काकडारती, 7 वाजता मंगलारती, 7 ते 8 ः रामप्रहर महिला मंडळ (रामपेठ) यांचा सामूदायिक रामजप व हरिपाठ, दुपारी 11.30 ते 12 आणि 3 ते 4 ः महिला मंडळाचा भजन धावा, 4 ते 5 ः सामूदायिक हरिपाठ, सायंकाळी ः 5 ते 6 चक्री भजन, 6 ते 6.30 ः संध्यापुजा, धुपारती होईल.
@@AUTHORINFO_V1@@