रोटरी नंदनगरीचा ‘मानवता की दिवाली’ उपक्रम कौतुकास्पद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
नंदुरबार, 7 नोव्हेंबर - धडपड व सेवेचा ध्यास असणारे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चळवळीला गती येते. त्याची प्रचिती रोटरी क्लब ऑफ नंदनगरीला पाहून येते. रोटरी नंदनगरीचे काम अतिशय कौतुकास्पद आहे.
 
‘ मानवता की दिवाली’ उपक्रमांतर्गत या परिवाराने जाणीव जागृती केली असून आपण सर्व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करुया, असे अवाहन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.
 
कै.मोहनसिंग कन्हैयालाल रघुवंशी प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, भोणे रोड, नंदुरबार येथे रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे ‘मानवता की दिवाली’ कार्यक्रम घेण्यात आला.
 
प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अ‍ॅड.मदनलाल जैन, उद्योजक देवेंद्र जैन, भावेश जैन, पत्रकार रमाकांत पाटील, क्लबचे अध्यक्ष शब्बीर मेमन, सचिव प्रितिश बांगड आदी उपस्थित होते.
 
डॉ. कलशेट्टी म्हणाले की, आपण सर्वांनी प्लास्टिक बंदी करण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. रोटरी नंदनगरीने अल्पावधीतच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून एक चांगला पायंडा पाडला आहे.
 
उपक्रमांतर्गत रोटरी नंदनगरीतर्फे भोणे फाटा परिसरातील वसाहतीतील गरीब कुटुंबाच्या 130 घरांना रंगकाम करून दिले. तसेच घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करुन 300 विटमिन व कॅल्शियमची औषधी देण्यात आली.
 
तसेच दिवाळीसाठी मिठाई, फराळ व चॉकलेट घरोघरी वाटप करण्यात आले. 500 पेक्षा अधिक महिलांना साड्या तसेच लहान मुलांना कपडे वाटप करण्यात आले. तेथील विद्यार्थ्यांना 500 जोडी चप्पलही वाटप करण्यात आले. 500 जणांना अन्नदान वाटप करण्यात आले.
 
या उपक्रमास सहकार्य करणारे डॉ.विशाल चौधरी, मनोज गायकवाड, मनीष बाफना, शैलेश जाधव, युनुसभाई सैयद, गिरीश जैन, हर्षद मेमन यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
प्रास्ताविक क्लबचे अध्यक्ष शब्बीर मेमन यांनी केले. सूत्रसंचालन नागसेन पेंढारकर यांनी तर आभार जितेंद्र सोनार यांनी मानले. यशस्वीतेसाठी क्लबचे सदस्य निलेश तवर, वसंत रावल, इसरार सैयद, हाकीम लोखंडवाला, नंदू सोनी, जय गुजराथी, दिनेश साळुंखे, अ‍ॅड. प्रेमानंद इंदिस, राजनसिंग चांदेल, कैलास मराठे, अपूर्व पटेल आदींनी परिश्रम घेतले.
@@AUTHORINFO_V1@@