वाघिण मृत्यु प्रकरणी राजकारण करू नये

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |


 


मुंबई: टी-१ (अवनी) या नरभक्षक वाघिणीच्या मृत्युप्रकरणी वन्यजीव प्रेमी,विविध राजकीय पक्षांचे प्रमुख यांनी जे हीन दर्जाचे आरोप करत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा राजीनामा मागण्याचे प्रकार सुरू आहेत हे हीन दर्जाचे राजकारण आहे असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काँग्रेस नेते संजय निरुपम यांना लगावला. रावसाहेब दानवे पाटील म्हणाले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही वनविभागाने केली. मुळात कोणत्याही वाघाला मारण्याचे आदेश वनमंत्री देवूच शकत नाही. या वाघिणीच्या मृत्यु प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समित्यांचे गठन करण्यात आले आहे.”

 

निरूपम यांनी जे आरोप या प्रकरणी केले आहेत त्याबाबत त्यांच्यावर अब्रु नुकसानीचा दावा ठोकण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात वाघांची संख्या वाढविण्यासाठी त्यांनी वनमंत्री म्हणून केलेले प्रयत्न उभ्या महाराष्ट्रासमोर आहे. भाजप वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पूर्णपणे पाठिशी असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्हयातील पांढरकवडा वनविभागाअंतर्गत कळंब, राळेगांव व केळापूर या तीन तालुक्याच्या परिसरात गेल्या दिड वर्षापासून या वाघिणीची दहशत होती. या वाघिणीने १३ आदिवासी, शेतकरी,शेतमजूरांचे बळी घेतले. या वाघिणीच्या दहशतीमुळे शेतकरी शेती सुध्दा करू शकत नव्हते. असे असताना जनभावना लक्षात घेता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ही कार्यवाही करण्यात आली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या प्रकरणी अकारण दोष दिला जात आहे.असेही ते म्हणाले.

 

अवनी वाघिणीच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी व्हावी

 

अवनी वाघिणीची शिकार करण्यात आली. त्यानंतर आता ही शिकार नियमानुसार केली का नाही, याची चौकशी करण्यासाठी जी समिती नेमली आहे तो एक फार्स आहे. निवृत्त न्यायाधीशांमार्फत कमिटी बनवून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

 

काय म्हणाले होते निरुपम

 

अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी,” अशी मागणी निरुपम यांनी केली. शिवाय, “मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत,” असा गंभीर आरोपदेखील निरुपम यांनी केला आहे.

 

अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तस्करांसोबत जोडलेले माझे संबंध म्हणजे राजकीय हीनता आहे. इतक्या खालच्या स्तराला जाऊन तथ्यहीन आरोप मी आजवर राजकीय आयुष्यात बघितले नाही. त्यामुळे त्यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यात अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर वाघिणीच्या मृत्यूची चौकशी समिती आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली नेमू शकतो असे तिखट उत्तर उध्दव ठाकरेंना दिले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@