बहीणाबाई चौधरी विद्यापीठ हॉकी संघात जैन स्पोर्ट्सच्या नऊ मुली

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 7 नोव्हेंबर - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ महिला मुलीचा संघ आज जळगावहून ग्वाल्हेरसाठी रवाना झाला. यासंघात 16 खेळाडू पैकी जैन स्पोर्ट्स अ‍ॅकडमीच्या नऊ खेळाडूंचा समावेश आहे
 
या नऊ खेळाडूना जैन स्पोर्ट्सचे अशोक जैन, हॉकी जळगावचे अतुल जैन, हॉकी महाराष्ट्रच्या सहसचिव प्रा. डॉ. अनिता कोल्हे व फ़ारुक शेख यांनी क्रीड़ा साहित्य देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
 
त्या वेळी अरविंद देशपांडे ,हॉकी कोच लियाकत अली, फुटबॉल कोच अब्दुल मोहसिन, प्रो डॉ शमा सराफ, विनया जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम लियाकत अली यांनी खेळाडू व विद्यापीठ संघाबाबत माहिती विषद केली.
 
हॉकी महाराष्ट्र व जैन स्पोर्ट्सचे फ़ारूक शेख यांनी खेळाडूना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रो डॉ. अनिता यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. अरविंद देशपांडे यांनी आभार मानले.
 
निवड झालेले खेळाडू
 
माधुरी भारूडे (गोलकीपर), निशा सपकाळे,नूतन शेवाळेे,मोहिनी कोळी,सायली लोखंडे,(सर्व बेंडाले कॉलेज) मोहिनी खारवाल (डी एन सी समाजकार्य) दीपिका सोनवणे व रूपाली मराठे (एम जे कॉलेज). निवड झालेल्या खेळाडूचे विद्यापीठ क्रीड़ा संचालक प्रा डॉ दिनेश पाटील,एमजेचे श्रीकृष्ण बेलोरकर व बेंडाळे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य रत्ना महाजन यांनी अभिनंदन केले
@@AUTHORINFO_V1@@