मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |


 


मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर रविवार, ११ नोव्हेंबरला मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर शनिवारी मध्यरात्री तर पश्चिम रेल्वेवर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्यातही दिवाळीनिमित्त प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात आला नव्हता.

 

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण जलद रविवार, ११ नोव्हेंबरला स. १०.३० ते दु. ३ पर्यंत मेगाब्लॉक आहे. सीएसएमटीहून सुटणार्‍या जलद, अर्धजलद लोकल स. ९.२५ ते दु. २.२५ पर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड स्थानकावरही थांबतील. ठाण्यापुढील जलद लोकलना ठाणे ते कल्याणपर्यंत धीम्या मार्गावर वळवताना सर्व स्थानकांवर थांबे देण्यात येतील. या गाड्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील. कल्याणहून सुटणार्‍या सर्व जलद, अर्धजलद लोकल स. १०.३७ ते दु. २.३१पर्यंत दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला स्थानकातही थांबतील. या गाड्या सुमारे १५ मिनिटे उशिराने धावतील.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@