वरणगावात महर्षी वाल्मीक ऋषी सभागृह होणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |
वरणगाव - शहरातील कोळी वाड्यात महर्षी वाल्मिक ऋषी सभागृहाचे भूमिपूजन व गुणगौरव समारंभ आमदार संजय सावकारे, चंद्रकांत बढे यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आदिवासी कोळी समाज विकास संस्थेच्या माध्यमातून व नगरसेवक रवींद्र सोनवणे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम पार पडला.
 
नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक राजेंद्र चौधरी, रवींद्र सोनवणे, सुधाकर जावळे, जिल्हा परिषद सदस्या सरला कोळी. पंचायत समिती सदस्या वंदना उन्हाळे, दिलीप सूर्यवंशी, सीताराम कोळी, प्रदीप सोनवणे, आर.डी.सोनवणे आदींच्या हस्ते महर्षी वाल्मिक यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यानंतर वाल्मिक ऋषी सभागृहाचे भूमिपूजन व विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
@@AUTHORINFO_V1@@