कृउबा समिती, जैन उद्योेग, अमोल शिंदे यांच्यातर्फे पाचोर्‍यात 15, 16 ला ‘किसान कृषी प्रदर्शन’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
पाचोरा, 7 नोव्हेंबर - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती व अमोल शिंदे आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि., महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या तर्फे कृषी ज्ञानाची गंगा प्रत्येक शेतकर्‍यांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने ‘किसान कृषी‘ या राज्यस्तरीय भव्य कृषी प्रदर्शनाचे 15व 16 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
 
पाचोरा येथील भडगाव रोडवरील दाजीबा हॉटेल समोरील अटल मैदान येथे हे प्रदर्शन होणार असून 12 एकर क्षेत्रावर भरणारे पाचोरा - भडगाव तालुक्यातील इतिहासातील पहिले असे राज्यस्तरीय प्रदर्शन ठरणार आहे.
 
शेतकर्‍यांच्या आवडीच्या गरजेच्या विषयावरील विविध पिकांच्या आधुनिक शेतीचे लाईव्ह मॉडेल ह्या प्रदर्शनाचे प्रमुख वैशिष्ट्ये असेल. प्रगतिशील शेतकर्‍यांचा सन्मान सोहळा, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदत देखील या प्रदर्शनात केली जाणार आहे.
 
‘महाराजस्व अभियान’ अंतर्गत विविध शासकीय योजनांची नावनोंदणी, दाखले वाटप व मार्गदर्शन केले जाणार आहे दोन दिवस चालणार्‍या कार्यक्रमास जिल्हाधिकारी निंबाळकर, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसीलदार कापसे, राजकीय, सामाजिक, कृषी क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील शेतकरीही उपस्थित राहणार आहेत.
 
150 संस्था सहभागी होणार
 
प्रदर्शनात शेती आणि शेतीपूरक उद्योग, जोडधंदे, शासनाचे सर्व संलग्न विभाग, महिला बचत गट आदी 150 संस्था सहभागी होणार आहे.
दुष्काळावर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्र प्रणाली व कृषि विषयक संकल्पना जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पत्रपरिषदेत अमोल शिंदे यांनी केले.
 
सभापती सतीश शिंदे, उपसभापती अ‍ॅड. विश्वासराव भोसले, पंचायत समितीचे सभापती बन्सीलाल पाटील, जिप सदस्य मधुकर काटे, संचालक नरेंद्र पाटील, दिलीप पाटील, सिंधुताई शिंदे, प्रिया संघवी, सुनंदा बोरसे, धोंडू हटकर, अनिता चौधरी, नीरज जैन , प्रफुल्ल संघवी आदी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@