दिवाळीत एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी खूशखबर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
जळगाव, 7 नोव्हेंबर - एसटी महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना घोषित झालेल्या वेतनवाढीचा फरक मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, महामंडळ प्रशासनाने याबाबत निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील चार ते पाच हजार सेवानिवृत्तांना होईल. या संदर्भात कामगार सेनेच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच परिवहनमंत्र्यांची भेट घेतली होती.
 
एसटी कर्मचार्‍यांना 1 एप्रिल 2016 पासून 4 हजार 849 कोटी रुपयांची वेतनवाढ जाहीर झाली असून, जून 2018 पासून ही वाढ लागू करण्यात आली आहे.
 
परंतु एप्रिल 2016 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचार्‍यांना आजपर्यंत कोणताही आर्थिक लाभ मिळाला नव्हता. या संदर्भात माजी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब शेख यांनी नुकतीच कामगार सेनेचे विभागीय सचिव राजेंद्र पाटील, शिवाजी हटकर यांच्यासह परिवहनमंत्री दिवाकर रावते व संघटनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांची भेट घेऊन सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना एकरकमी थकबाकी द्यावी, अशी मागणी केलेली होती.
 
परिवहनमंत्र्यांनी नोव्हेंबर 2018 अखेरीस ही रक्कम देण्याचे आश्वासन दिले. कर्मचार्‍यांना दिवाळीत पगार वाढ, थकबाकीचे पाच हप्ते, महागाई भत्ता व 2500 रुपये दिवाळी भेट दिल्याबद्दल यावेळी ना. रावते यांचे संघटनेतर्फे आभार मानण्यात आले.
 
दरम्यान, 1 एप्रिल 2016 ते 31 मे 2018 या कालावधीतील सेवानिवृत्त कर्मचारी, बडतर्फ, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, मृत्यू आदी कारणांमुळे महामंडळाच्या सेवेतून कमी झालेल्या कर्मचार्‍यांबाबत महामंडळाने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कामगार सेनेचे विभागीय सचिव राजेंद्र पाटील यांनी दिली.
 
1) निवृत्त, स्वेच्छानिवृत्त, बडतर्फ, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र, मृत्यू आदी कारणांमुळे महामंडळाच्या सेवेतून कमी झालेल्या कर्मचार्‍यांना परिपत्रक क्रमांक 27/2018 अन्वये झालेल्या वेतनवाढीमुळे रजा रोखीकरण आणि उपदानातील फरक एकरकमी देण्यात येणार आहे
 
2) वेतनातील फरक समान 48 हप्त्यांत मोजून त्यापैकी पाच हप्त्यांची रक्कम तात्काळ अदा करण्यात येणार आहे.
 
3) रा. प. महामंडळाच्या भविष्य निर्वाह निधी अंशदान रकमेतील समान फरक 48 हप्त्यांमध्ये वेतनाच्या फरकासोबत अदा केला जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@