दिवाळीनिमित्त बाहेरगावाहून आलेल्या एसटी चालक-वाहकांना फराळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

गुलाबाचे फुल देत केला सत्कार : पाचोरा आगाराचा आगळावेगळा उपक्रम


 
पाचोरा, 7 नोव्हेंबर - दिवाळी सणांमध्ये आपल्या घरापासून नोकरीनिमित्त दूर राहून प्रवाशांची अखंड सेवा करणार्‍या एसटीच्या चालक वाहकांना मायेची ऊब देणारा दिवाळी फराळ वाटपाचा आगळा वेगळा असा उपक्रम पाचोरा आगारात राबविण्यात आला.
 
दिवाळीच्या पहिल्या दिवशी बाहेरगावावरून बसेस घेऊन आलेल्या चालक-वाहकांना तसेच स्थानिकांनाही अतिशय स्नेहभावनेने फराळ वाटप करून दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
 
पाचोरा आगार प्रमख देवेंद्र वाणी यांच्या हस्ते कर्तव्यावर असलेल्या बाहेरगावाहून कामगिरी निमित्त आलेल्या चालक-वाहकांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
 
सणासुदीला कुटुंबापासून दूर राहात काम करणार्‍या चालक-वाहकांना सण व उत्सवाची उणीव भासू नये म्हणून हा फराळ वाटपाचा व गुलाबाचे पुष्प देत सत्काराचा आगळा वेगळा असा हा उपक्रम राबविण्यात आला.
 
या उपक्रमातून एसटीच्या कर्मचार्‍यांच्या मध्ये स्नेहभावाची भावना वाढीस लागते एकत्र काम करत असताना सहकारी कर्मचार्‍यांच्या प्रेरणा बनवून त्याला प्रोत्साहित करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने साधली जाते.
  
एसटी प्रशासनात कामगिरीच्या जोरावर उत्पन्न वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करते. या पुढे सुध्दा उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे,असे आवाहन आगार प्रमुख देवेंद्र वाणी यांनी या वेळी केले.
 
तसेच प्रवासी सेवेचा आनंद एसटी कर्मचार्‍यांनी घेत असतानाच , सर्वसामान्य जनतेची दिवाळी उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी होण्यासाठी त्यांना एसटीच्या सुरक्षित व सुखकर प्रवासाची हमी द्यावी. अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. प्रवाशांनाही गुलाबपुष्प देत सत्कार केला आगार प्रमुख देवेंद्र वाणी यांनी कर्मचारी व प्रवाशांना दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या.
  
पाचोरा आगाराचे स.का.अ.योगेश जाधव, लिपीक विनोद पवार, लिपीक रवी पाटील, जागृती पाटील, अविनाश भालेराव, इंटक संघटनेचे राज्य सहसचिव रवि पाटील, महेश्वर पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, वाहतुक नियंत्रक एस एस चौधरी, वाहतुक नियंत्रक पांडुरंग जाधव,लेखाकार डी. के. वाल्हे, ब्राम्हणे आदी पाचोरा आगारातील कर्मचार्‍यांनी प्रवाशांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
 
कर्मचारी जसे आपला परिवार सोडून बाहेगावी रात्री बेरात्री कार्यरत राहात सेवा देतात, त्याच बरोबर जनतेने सुध्दा चालक वाहकांना सहकार्य करावे, असे आवाहन रवि पाटील यांनी यावेळी केले.
 
पाचोरा- पुणे रातराणी बस सुरु
 
दिवाळी विशेष भेट प्रवाशांच्या सोयीसाठी पाचोरा आगारातर्फे रातराणी बस सुरु करण्यात आली आहे. ही बस दररोज रात्री आठ वाजता सुटेल, सर्व थरातील जनतेने सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनही पाचोरा आगारातर्फे करण्यात आले आहे.
@@AUTHORINFO_V1@@