रेल सिटीतर्फे आदिवासींना दिवाळी फराळ वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |
भुसावळ, 7 नोव्हेंबर - दिवाळीच्या पार्श्वभुमीवर आदीवासी पाड्यावरील रहिवाशांंना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे दरवर्षाप्रमाणेच यंदाही फराळाचे वाटप करण्यात आले.
 
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीच्या प्रत्येक सदस्यांच्या घरून फराळ एकत्र करून भिलमळी व मुशाळतांडा येथील रहिवाशांना वाटप करण्यात आला.
 
रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीने सोमवारी भिलमळी आणि मुशाळतांडा परिसरातील रहिवाशांना 127 किलो फराळ वाटण्यात आला. रेलसिटीतर्फे हा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून राबवला जात आहे.
 
या वस्तीतील मुलांच्या चेहर्‍यावर यामुळे आनंद फुलला. क्लबचे अध्यक्ष सोनू मांडे, सेक्रेटरी डॉ.मकरंद चांदवडकर, प्रोजेक्ट चेअरमन सागर वाघोदे, रोटरी क्लब सदस्य चेतन पाटील, विनायक फालक, मनोज सोनार, पंकज भंगाळे, महेश चौधरी, उमेश घुले, संदीप जोशी, पंकज भंगाळे आदींची उपस्थिती होती.
 
यावेळी सदस्यांनी सहकार्य केले. दिवाळीत प्रत्येक कुटुंबाच्या घरातील आनंद द्विगुणीत व्हावा यासाठी फराळाचे वाटप केले जात असल्याचे अध्यक्ष मांडे यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@