‘म्हाळसा’ सुरभी हांडे यांच्या हस्ते ‘सेवालय’ उपक्रमात भोजनाचे वितरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
 
जळगाव, 7 नोव्हेंबर - दिवाळीनिमित्त मंगळवारी सकाळी ‘जय मल्हार’ मालिकेतील नायिका म्हाळसाच्या भूमिकेतील कलावंत सुरभी हांडे यांच्या हस्ते ‘सेवालय’मधील गरजू रुग्ण व त्यांच्या सोबतच्या नातलगांना , अशा सुमारे 100 जणांना भोजन पॅकेट आणि मिष्टान्न म्हणून लाडू देण्यात आला.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रशस्त जागेत हा प्रकल्प गेल्या 5 वर्षापासून सुरु आहे. सोबत तिचे वडील संजय हांडे, कनिष्ठ भगिनी श्रीनिधी आदी होते.
 
ज्येष्ठ स्वयंसेवक, कार्यकर्ते दीपकराव घाणेकर, अनिल तारे, विवेक जोशी आदींनी त्यांचे स्वागत केले. सर्वप्रथम अन्नपूर्णामातेच्या प्रतिमेचे पूजन झाले. ज्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात येणे भाग पडते पण येथे काळजी, देखभाल करण्यासाठी कुणीच नाही, जेवणाचीही व्यवस्था नाही...,अशा गरजूंसाठी अथांग मानवताधर्म भावनेने हा दिलासादायी ‘सेवालय’ प्रकल्प कार्यरत आहे.त्यात सर्वेक्षणाअंती गरजूंना दुपारचे भोजन दिले जाते.
 
नेहमीच्या निर्देशानुसार सर्व गरजू कुपनसह सेवालयासमोर एकत्र येत रांगेत थांबले. कार्यकर्त्यांनी एकात्मता मंत्र आणि नंतर रांगेतील सर्व जणांनी ‘भोजन मंत्र’ म्हटला. सेवालयाचे विनोदराव कोळी, निंबाभाऊ सैंदाणे, पराग महाशब्दे, नंदू शुक्ल, महेंद्र साखरे, मंगलाताई पाटील, विनायक वाणी, परधाडे ता.पाचोर्‍याचे नितीन पाटील आदी उपस्थित होते.
 
प्रभावित होत दिली भेट आणि प्रशंसोद्गारही...
 
या सेवाकार्याबद्दल खूप काही ऐकून असल्याने प्रभावित होत सुरभी हांडे यांनी जळगाव भेटीत सेवालयाला भेट दिली आणि माहिती घेेत प्रशंसोद्गारही काढले.
@@AUTHORINFO_V1@@