संत कंवरराम यांचा शहीद दिवस साजरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
चाळीसगांव, 7 नोव्हेंबर - शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील मिरपूर मंगल कार्यालयात शहीद संत कंवरराम साहेब यांचा 79 वा शहीद दिवस साजरा करण्यात आला.
 
याप्रसंगी वासुदेवजी गुंडीयाल, नंदलालजी इसराणी यांच्या हस्ते माल्यार्पण पुजन करण्यात आले. त्याचप्रमाणे श्रध्दांजली अर्पण करून प्रसाद देखील वाटप करण्यात आला.
 
याप्रसंगी भारतीय सिंधू सभेचे महाराष्ट्र प्रदेश संरक्षक प्रीतमदासजी के. रावलानी, सिंधी मिरपूर पंचायतचे अध्यक्ष भोजराजजी पुंशी, सिंधी जनरल पंचायतचे अध्यक्ष शेखर बजाज, उपाध्यक्ष लालचंद बजाज, भारतीय सिंधू सभेचे उपाध्यक्ष साधुराम गेमनानी, सहसचिव सुरेश तलरेजा, कोषाध्यक्ष लक्ष्मण नागवानी, नांनकराम ओचानी, चंद्रलाल गोपलानी, मोहनदास मंदिरचे महंत गोपालदास, भारतीय सिंधू सभा युवा सुभाष बजाज, महेंद्र रावलानी, राम गोपलानी, अशोक गुंडीयाल, गंगाराम पवानी, भालचंद्र तलरेजा, मनोहर माखिजणी, ईश्वर वासवाणी, नंदलाल इसराणी, मंसाराम पुंशी इत्यादी भाविक उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@