बोंडअळी : भरपाईचे 30 कोटी प्राप्त : जिल्हाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
नंदुरबार : खरीप 2017 मध्ये कापसावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा बाधीत शेतकर्‍यांना राज्य शासनातर्फे अर्थसहाय्य मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे शासनाकडे 89 कोटी 65 लाख 22 हजाराची मागणी केली होती.
 
त्यानुसार तिसरा हप्ता 29 कोटी 89 लाख 22 हजार रुपयाचे अनुदान प्राप्त झाले आहे, ते तहसिलदारांकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी आज दिली.
 
 
जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यापूर्वी या नुकसान भरपाईपोटी शासनाकडून पहिला हप्ता मे 2018 मध्ये 23 कोटी 90 लाख अनुदान प्राप्त झाले होते. प्राप्त अनुदान सर्व तालुक्यांना वितरीत करण्यात आले होते. सर्व तहसिलदारांनी संबंधित बाधीत शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यावर अनुदान यापूर्वीच जमा केले आहे.
 
राज्य शासनाकडून 17 जुलै, रोजी कापूस बोंड अळी बाधीत जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी 35 कोटी 86 लाख दुसरा हप्ता अनुदान प्राप्त झाले होते.
 
अनुदान तातडीने तहसिलदारांकडे वितरीत करण्यात आले असून त्यात नंदुरबार 13 कोटी 13 लाख 38 हजार 554, नवापूर 3 कोटी 11 लाख 8 हजार 32, अक्कलकुवा 58 लाख 97 हजार 202, शहादा 17 कोटी 60 लाख, 5 हजार 878, तळोदा 1 कोटी 35 लाख 25 हजार 894 तर अक्राणी तालुक्यासाठी 7 लाख 24 हजार 440 रुपयांचा दुसरा हप्ता यापूर्वीच वितरीत करण्यात आला आहे.
@@AUTHORINFO_V1@@