मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत होणार भूमिपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
 
चाळीसगांव, 7 नोव्हेंबर - तालुक्यातील वाड्या-वस्त्यांना जोडणार्‍या रस्त्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्यासह सध्या असलेल्या रस्त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कामे करणे आवश्यक असल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना राबविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आला होता.
 
या योजनेंतर्गत आ. उन्मेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यात गुणवत्तापूर्ण रस्त्यांचे जाळे विणले जात असून तालुक्यातील खडकी - गणेशपूर ते शिंदी - राजदेहरे सेटलमेंट रस्ता (8 कोटी 71 लक्ष) व रा.म.211 -रांजणगाव ते लोंजे रस्ता (4 कोटी 4 लक्ष) व खेडगाव ते पोहरे रस्ता (1 कोटी 36 लक्ष) आदी 14 कोटी 11 लक्ष रुपयांच्या रस्त्याची आणि मोर्‍यांची कामे मंजूर झाली आहेत.आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कामांचा भूमिपूजन सोहळा होणार आहे.
 
 
रस्त्यांच्या सुधारणेसाठी आजवरचा सर्वाधिक निधी प्राप्त झाल्यामुळे या परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळून दळणवळण व्यवस्था सक्षम पणे सुधारणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे .
तालुका विणला जातोय रस्त्यांच्या धाग्यांनी
 
चाळीसगाव तालुका हा विविधता जपणारा तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. तालुक्यातील अनेक गावे ही अत्यंत महत्वाची व राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक-कृषी आदी सर्वच क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारी आहेत.
 
आज तालुक्याला नाशिक-धुळे - औरंगावाद व जळगाव शी जोडणारे सर्वच प्रमुख राष्ट्रीय महामार्ग ,राज्य महामार्ग,तसेच ग्रामीण रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरु आहेत.
 
तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रयत्नाने,पाठपुराव्यामुळे आजवर मिळाला नाही इतका निधी मिळवून विकासकामे आज सुरू आहेत.
@@AUTHORINFO_V1@@