बजरंग पुनीया जागतिक क्रमवारीत अव्वल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |


 


नवी दिल्ली: भारतीय पैलवान बजरंग पुनियाने शनिवारी ६५ किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावत भारताची मान गौरवाने उंच केली. २४ वर्षीय बजरंगने कॉमनवेल्थ गेम्स तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. तसेच वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये रौप्य पदक पटकावले होते. त्याच्या या कामगिरीमुळे त्याऩे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले आहे.

 

बजरंग पुनीयाने पाच पदके पटकावत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या यादीत ९६ अंकांसह अव्वल स्थानावर झेप घेतली. तसेच बुडापेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मानांकन मिळवणारा तो एकमेव भारतीय ठरला आहे. ’आपण जगातला सर्वोत्तम कुस्तीपटू व्हावे असे प्रत्येक अॅथलीटचे स्वप्न असते. परंतु वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावून सर्वोच्च स्थान मिळाले असते तर मला आणखी आनंद झाला असता. पण मी खूप मेहनत घेत असून हे स्थान टिकवण्याचा आपण प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया बजरंगने दिली.

 

पहिल्या दहामध्ये बजरंग एकमेव भारतीय खेळाडू

 

पहिल्या दहा कुस्तीपटूंमध्ये बजरंग हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. महिला गटात भारताच्या पाच महिला कुस्तीपटूंनी आपापल्या गटांमध्ये अव्वल दहामध्ये स्थान मिऴवले आहे. पूजा ढांडा ५७ किलो गटामध्ये ५२ गुणांसह सहाव्या स्थानावर तर रितू फोगट ५९ किलो गटामध्ये २९ गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@