अंतर्नाद प्रतिष्ठान’तर्फे सातपुड्यात 400 जणांना फराळासह कपडे वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

काळाडोह, मोर धरण, विटव्यात राबवला उपक्रम; चिमुकल्यांच्या चेहर्‍यावर हास्य


भुसावळ, 7 नोव्हेंबर - शहरातील अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे ‘वाटीभर फराळ द्या, वंचितांचे तोंड गोड करा’, हा उपक्रम दिवाळीनिमित्त राबवण्यात आला. त्यात मंगळवारी सातपुड्यातील काळाडोह, मोर धरण परिसर, व विटवा अशा तीन वाड्या-वस्तीतील 400 जणांना फराळ, नवीन कपडे, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
 
प्रकल्पप्रमुख जीवन महाजन, समन्वयक भूषण झोपे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दात्यांकडून मदत गोळा केली. त्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.
 
वाड्या वस्त्यांतील बंधू-भगिनी व चिमुकल्या बालकांच्या चेहर्‍यावर फराळ व नवीन कपडे स्वीकारताना हास्य फुलले होते.भुसावळकरांच्या आपुलकीचा आनंद त्यांच्या चेहर्‍यांवर कळत-नकळतपणे दिसून आला.गेल्या वर्षीही प्रतिष्ठानतर्फे 200 जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला होता. यंदा त्याला व्यापक स्वरुप देण्यात आले.
 
काळाडोह येथे 230, मोर धरण वस्तीत 60, विटवा येथील वस्तीत 110 अशा 400 जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी उपक्रमाची माहिती दिली.
 
या वर्षी भुसावळ येथील विघ्नहर्ता पब्लिकेशनचे संचालक रवींद्र निमाणी, नगरसेवक युवराज लोणारी, मुकेश पाटील, व्यावसायिक जयकिसन टेकवाणी, शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष नीलेश रायपुरे, हर्षद महाजन, डॉ. निलिमा नेहेते, संदीप रायभोळे, गणेश फेगडे, हरीष फालक, संजय मोताळकर, व. पु. होले, पुण्याचे आनंद पाटील, ट्रिनिटी शिरसाठ, महेंद्र किनगे, विनोद अग्रवाल, प्रदीप सोनवणे, अंजना शर्मा या दात्यांचे सहकार्य लाभले.
 
यांची होती उपस्थिती
 
उपक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील सेवाभावी व्यक्ती सहभागी झाल्या. फराळ वाटपप्रसंगी ग.स.चे संचालक योगेश इंगळे, संतोष सोनवणे, श्रीकांत जोशी, शैलेंद्र महाजन, शैलेंद्र भंगाळे, दीपक कुरकुरे, तेजेंद्र महाजन, संजय भटकर, अमितकुमार पाटील, आर. डी. सोनवणे, ज्ञानेश्वर घुले, विक्रांत चौधरी, राजेंद्र जावळे, विपीन वारके, परेश सपकाळे, सुरेश इंगळे, हरीष बोंडे, विनय भोगे, रजिंदसिंग थिंड, समाधान जाधव, निवृत्ती पाटील, शिक्षक लखारा, मिलिंद कोल्हे, प्रा. डॉ. श्याम दुसाने, अमित चौधरी, संदीप सपकाळे, देव सरकटे, प्रभाकर नेहेते ,शुभम भंगाळे यांची उपस्थिती होती.
दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
 
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. प्रत्येकाच्या आयुष्यातील अंधार भेदून प्रकाशाचे किरण यावेत, या उद्देशाने अंतर्नादचे काम सुरू आहे. यंदा वाड्या-वस्त्यांत फराळासह नवीन कपडे, शैक्षणिक साहित्य वाटपाला भरभरून प्रतिसाद मिळाला.
 
पुढच्या वर्षी या उपक्रमाला व्यापक स्वरुप देण्याचा प्रयत्न करू. महाविद्यालयीन युवक-युवतींनाही जोडण्याचा प्रयत्न राहील. दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी होण्याचे भाग्य लाभले, अशी कृतज्ञ भावना प्रकल्पप्रमुख जीवन महाजन, समन्वयक भूषण झोपे यांनी व्यक्त केली.
@@AUTHORINFO_V1@@