टेंबलायला 50 विद्यार्थ्यांना कपडे, फराळाचे वाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Nov-2018
Total Views |

 
शिंदखेडा, 7 नोव्हेंबर - तालुक्यातील टेंबलाय येथे जि. प. शाळेत 50 विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप करण्यात आले.
तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे अनेक ठिकाणची दिवाळी अंधारातच जात आहे.
 
ही भीषण स्थिती लक्षात घेता शिंदखेडा गावाचे जावाई सातारा येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी 50 विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे आज शाळेत वाटप करीत त्यांच्या सोबत दीपोत्सव साजरा करण्यात आला.
 
अध्यक्षस्थानी सरपंच मन्साराम माळचे आणि प्रमुख पाहुणे चिरणे विभागाचे केंद्र प्रमुख चुडामण गुलाब बोरसे, मुख्याध्यापक ईश्वर निंबाजी निकम, शाळा समितीचे अध्यक्ष दीपक माळी आदी उपस्थीत होते. संयोजन संदीप पाटील यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@