भारतीयांच्या हृदयातले सरदार चे प्रकाशन उत्साहात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |
 
 

भारतीयांच्या हृदयातले  सरदार चे प्रकाशन उत्साहात

भुसावळ, 1 नोव्हेंबर
 
येथील सीमा भारंबे लिखील '' भारतीयांच्या हृदयातले सरदार'' या पुस्तकाचे प्रकाशनाचे आयोजन 31 रोजी रेल्वेच्या एमओएच शेड, सरदार पटेल जयंती समितीने केले होते.
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने एमओएच विभागाचे वरिष्ठ डि.ई.ई. , टि.आर.एस. सतीश चव्हाण, श्रीमती चव्हाण, टि.ई.ई. निखील सिंग, ए.डि.ई.ई. मोहन चौधरी, ए.डी.ई.ई. संदिपकुमार , डॉ.विनायक महाजन, म्युनिसिपल हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे, द.शि.विद्यालयाचे मुख्याध्यापक जे.बी.राणे, मध्यरेल्वे युनियनचे पदाधिकरी यांच्याहस्ते सीमा भारंबे लिखीत भारतीयांच्या हृदयातले सरदार पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
 
या वेळी सीमा भारंबे यांनी मनोगत व्यक्त करतांना सरदार पटेल हे उत्तुंग व्यक्तीमत्व आहे. त्यंचे कतृत्व आणि व्यक्तीमत्व पुर्णपणे शब्दांकित करणे कोणासही शक्य नाही. सरदार पटेल हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे. प्रत्येक भारतीयांच्या हृदयात त्यांचे स्थान आहे. या पुस्तकात सरदार वल्लभभाई पटेल यांचा जीवन प्रवास, संस्थानाचे विलीनीकरण, सरदारांसोबतचे संघर्षयात्री(तत्कालीन नेते, त्यांच्यासोबत सरदारांचे वैयक्तिक आणि राजकीय संबध) , परिशिष्ट , सरदारांचे पत्र , अनेकांच्या त्यांच्याबद्दलच्या आठवणी, स्टॅच्यू ऑफ यूनिटी आणि इतर बरच काही समाविष्ठ असल्याचे सांगितले.
डॉ.विनायक महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना सरदार पटेल यांनी खुप संघर्ष केला आणि त्यांच्याबद्दल लिहिणा-या सीमा भारंबे यांनी सुध्दा संयमी संघर्ष केला असल्याने त्यांना  सरदार पटेल शब्दांकित करता आले.तसेच डॉ. महाजन यांनी पटेल आणि अन्य नेत्यांच्या संबधांवर माहिती प्रकट केली.
 
 
एमओएच शेडचे वरिष्ठ अधिकारी सतीश चव्हाण यांनी आपल्या भाषणात सरदार पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीचे आज देशास लोकार्पण झाले आणि एमओएच शेडमध्ये भारतीयांच्या ह्मदयातले सरदार या पुस्तक प्रशासन करता आले हे आमच्यासाठी सन्मानाचे आहे. पटेल यांचे व्यक्तीमत्व महान असून प्रत्येकाने त्यांनी जोपासलेली मुल्यांची आपाल्या आयुष्यात अंमलबजावणी केली तर कोणत्याही संघर्षास आपण धैर्याने सामोरे जावू शकतो असे सांगीतले.
या कार्यक्रमास एमओएच मधील सर्व अधिकारी व कर्मचारीवृंद बहुसंख्येने उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@