कॉंग्रेसला केंद्र सरकारचा दणका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |
 

दिल्लीतील हेरॉल्ड हाऊस ताब्यात घेणार

   
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे मुखपत्र नॅशनल हेरॉल्डच्या दिल्लीतील मुख्यालयावर सरकार कब्जा करणार आहे. याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. भाडेपट्टी करारावर वृत्तपत्र मुद्रीत करण्यासाठी देण्यात आलेल्या भूखंडाच्या जागेतील विवध गाळे भाड्याने दिल्याने ही कारवाई केली जाणार आहे. या जागेवर कोणतीही छपाई सध्या केली जात नसल्याची माहिती उघड झाली आहे. इमारतीचा बहुतांश भाग हा भाड्याने देण्यात आलेला आहे. या प्रकरणी संबंधितांना नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे
 

सरकारकडून वृत्तपत्र प्रसिद्धीसाठी हा भूखंड देण्यात आला होता. त्याचा वापर मुद्रणासाठी करता अन्य कामासाठी झाला आहे. जमिन किमान भाडेकरारावर देण्यात आली होती, त्याचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करत असल्याचे संबधित सुत्रांनी सांगितले. या परिसरातील अन्य काही जणांनीही या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@