लघु उद्योजकांना सरकारचे पाठबळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |

 

 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी (एमएसएमई) सहाय्य आणि व्याप्ती वाढवण्यासाठीच्या एमएसएमई सपोर्ट एण्ड आऊटरिचकार्यक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. शंभर दिवस हा कार्यक्रम देशभरातल्या शंभर जिल्ह्यात राबवला जाणार आहे.

 

नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात उद्या दि. २ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्‌घाटन होणार आहे. केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली, केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाचे राज्यमंत्री गिरीराज सिंग आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी एमएसएमई क्षेत्राला अर्थसहाय्यासाठी सुलभता, बाजारपेठेची उपलब्धता, सहाय्य सुलभीकरणसंदर्भात सरकार आपली भूमिका मांडणार आहे. एमएसएमई उद्योगांपर्यंत पोहोचण्याचा उपक्रम शंभर दिवस सुरू राहणार आहे. देशभरातल्या एकूण शंभर जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवला जाईल. या दरम्यान अनेक केंद्रीय मंत्री जिल्ह्यांना भेट देऊन एमएसएमई उद्योग क्षेत्रासाठी केंद्र सरकार आणि अर्थ संस्था उपलब्ध करून देत असलेल्या विविध सुविधांबद्दल माहिती देतील.

 

रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या क्षेत्राचे अर्थव्यवस्थेच्या एकूण वाढीसाठी मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्याचाही या सपोर्ट एंड आऊटरिच प्रोग्रॅममध्ये समावेश असून दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत काशिनाथ घाणेकर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@