समभागातून समृद्धीकडे : हिकिन-अशी चार्ट्स

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |


मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे या चार्ट प्रकारांमध्ये लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट , पॉईंट-अॅण्ड-फिगर चार्ट, हिकिन-अशी, रेन्को चार्टस, इचिमुकू क्लाऊड, कागी चार्ट्स इत्यादी चार्ट समाविष्ट आहेत. पैकी आपण लाईन चार्ट, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, पॉईंट-अॅण्ड-फिगर चार्ट याबद्दल माहिती घेतली. आज हिकिन-अशी या खूप विशेष, खूप लोकप्रिय आणि योग्य निर्णय घेतल्यास भरपूर नफा मिळवून देणार्या प्रकाराचा आपण जरा विस्तृत विचार करूया...

 

)हिकिन-अशी (Heikin-ashi): या आधी नमूद केल्या गेलेल्या चार्टपेक्षा याचे वेगळेपण म्हणजे, या प्रकारात नेहमी सरासरी किंमत आधारभूत धरली जाते. हिकिन-अशी हा साधारणत: एक कॅन्डलस्टिक चार्ट आहे, जो काही चार्टिंग पॅकेजवर वेगळा निर्देशक म्हणून उपलब्ध असतो. साहजिकच व्यापारी दोन चार्टमध्ये तुलना करू शकतात. चार्टिस्ट समान असले तरी सरासरी किंमत आधारभूत धरली जाण्याच्या मूलभूत नियमामुळे आपल्याला दोन चार्टमध्ये भिन्न भिन्न दृष्टिकोन मिळतात. जेथे किमतीमधील चढ आणि उतार खूप जास्त असतो तेथे आणि तेव्हा, स्मूथ ट्रेडिंगसाठी हा चार्ट खूप उपयोगी पडतो. हे जपानी तंत्रज्ञानखूपच लोकप्रिय आहे. म्हणूनच मुद्दामहून हिकिन-अशी कॅन्डलस्टिक मोजण्यासाठी सूत्र देत आहे. ) क्लोज = (ओपन प्राइस + हाय + लो + बंद) / , () ओपन = (मागील बारची खुली किंमत + मागील बारची बंद किंमत) / () उच्च = कमाल मूल्य (उच्च, उघडा, बंद) () कमी = किमान मूल्य (लो, ओपन, बंद) मित्रहो, ही सूत्रे लक्षात ठेवायची खरंतर काही गरज नाही, पण जेव्हा तुम्ही वरील कॅन्डलस्टिक बघता, तेव्हा ती बनते कशी, हे आपल्याला माहीत पाहिजे, एवढेच. या चार्टप्रमाणे बाय आणि सेलचा निर्णय घेणे खूपच सोपे जाते, हे निश्चित. आता याचा वापर कसा करायचा, ते बघूया किवा वेगवेगळ्या कॅन्डलचा अर्थ काय ते बघूया.

 

१) शेपूट नसलेल्या सकारात्मक कॅन्डल (निळ्या/हिरव्या): सत्रात वेग जोरदार उंचावलेला आहे आणि हा जोर कायम राहायची दाट शक्यता. अतिशय आक्रमक खरेदीदार आणि नफा मिळवायचा त्यांचा दृष्टिकोन. (जोरकस बाय सिग्नल)

 

) Shadows आणि wicks असलेल्या सकारात्मक कॅन्डल (निळ्या /हिरव्या): वाढीव किमतीला समर्थन मिळणे चालू आहे, किंमत वरच्या बाजूस जाण्याची दाट शक्यता. खरेदी केली असल्यास थोडे थांबून मोठा नफा मिळायची शक्यता.

 

). लांब wicks सह एक लहान कॅन्डल लेवू : (निळे किंवा लाल) : Doji candlestick formation प्रमाणेच, या कॅन्डलमुळे संपूर्ण प्रवाहात जवळजवळ संपूर्ण उलट बदल होण्याची शक्यता असते. अनिश्चिततेचे संकेत देणे, बाजारपेठेला उलट मार्ग किंवा उलट रेटा/धक्का बसणे असा याचा अर्थ असतो. हा सिग्नल मिळाल्यावर अजून प्रतीक्षा करणे म्हणजे स्वतःची दिशाभूल करण्यासारखेच असते. हा सिग्नल मिळाल्यावर आपण आपली पोझिशन क्लोज करून profit कमविणे चांगले.

 

) लाल Shadow आणि wicks असलेली नकारात्मक (लाल) कॅन्डल : मंदी किंवा नकारात्मक हालचाली किमतीत घट करण्यासाठी कार्यरत आहेत आणि किंमत अजून खाली जायची शक्यता. याचा दुसरा अर्थ असाही होतो की, खरेदीदार त्यांच्या बाय पोसितीओनमधून बाहेर पडत आहेत.

 

) शेपूट नसलेल्या नकारात्मक मेणबत्त्या (लाल): संपूर्ण मंदीचे वातावरण, विक्रेत्यांचा जोर, विक्रीची मजबुती मजबूत आहे आणि यामुळे किमतीत जोरदार घट होण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, आपण सेल करावे (जोरकस सेल सिग्नल) हिकिन-अशी शिकण्यासाठी आणि त्यामध्ये मास्टर होण्यासाठी काही वेळ लागेल हे निश्चित. तथापि, हे एकदा साध्य झाल्यानंतर, हिकिन-अशी तुमची निर्णय प्रक्रिया दोषविरहित, स्मूथ आणि निकोप करेल यात शंका नाही. आता वरील नियमांचा बाजारात कसा उपयोग होतो, ते बघूया. एका स्मूथ ट्रेडसाठी, सोप्या पद्धतीने, व्यापारी इतर निर्देशांबरोबर हिकिन-अशी वापरून, ट्रेडिंग सुधारू शकतो वा योग्य निर्णय घेऊ शकतो. इतर कोणत्याही चार्टबरोबर हिकिन-अशी वापरताना, आपल्या वैयक्तिक व्यापार शैलीसह चांगले कार्य करणारे संकेतक शोधणे चांगले आहे म्हणजे आपल्याला सहजपणे किमतीची दिशा निश्चित करता येते. इतकेच नाही तर किमतीची प्रतिकार आणि समर्थन स्थळेदेखील स्पष्ट होतात आणि आपला निर्णय चुकत नाही. उदाहरण म्हणून हिकिन-अशी, stochastic oscillator, या एका संकेतकाबरोबर जोडून बघूया काय होते ते.

 

 
 

) पॉईंट बी ला एक क्रॉस ओवर दिसतो आहे.

 

) पॉईंट बी ला लांब wicks सह एक लहान कॅन्डल body दिसते आहे (वर नमूद केलेला नियम क्रमांक

 

) येथून stock ची किंमत वाढून टक्के सरळसरळ नफा दिसतो आहे.

 

मित्रहो, हे फक्त एक उदाहरण आहे. आपण आपल्याला योग्य वाटणारे संकेतांक यामध्ये जोडू शकता. तुमचे वेगवेगळे प्रयोग आणि निरीक्षणच तुम्हाला अधिक परिपूर्ण बनवेल यात संशय नाही.

 

हिकिन-अशी हे असे एक व्यवहार्य साधन आहे की, जे ट्रेंडच्या गतीची पुष्टी करण्यासाठी मदत करते. मूव्हिंग अॅव्हरेजप्रमाणेच स्मूथ ट्रेडिंगसाठी हेही एक प्रभावी साधन आहे. अशा साधनांच्या वापरामुळे आपल्याला फक्त योग्य सौदे करायचीच सवय होते आणि फसगत टळते. बाजारातील कोणताही सहभागी बाजारपेठेच्या विस्तृत पल्ल्यावर बोट ठेवताना अशा साध्या साधनांचा लाभ घेऊ शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. आजचे लिखाण इंटरेस्टिंग असले तरी समजायला थोडे कठीण आहे. याबद्दल काही शंका असेल तर त्या सोडवण्यात आम्हाला आनंदच आहे. आणि नेहमीचा आपुलकीचा निरोप. आम्ही या प्रवासात आपल्याबरोबरच आहोत, याची खात्री बाळगा .

 
 
- विजय घांग्रेकर  

[email protected]

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@