कल्याणमधील विहिरीत बुडून ५ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |

 


 
 

कल्याण : कल्याणमधील नेतिवली परिसरातील विहीरीत पाचजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. आज दुपारी ही घटना घडली असून या पाच जणांपैकी दोघेजण हे अग्निशमन दलाचे कर्मचारी होते. तर एक सफाई कामगार होता. इतर दोन स्थानिक नागरिकांचाही या विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे. कल्याण पूर्वेतील चक्की नाक्याकडून लोकग्रामकडे जातांना असलेल्यार स्त्याच्या कडेलाच असलेल्या भीमाशंकर मंदिराजवळ ही विहीर आहे.

 
गाळ साफ करण्यासाठी एक सफाई कामगार या विहीरीत उतरला होता. बराच वेळ झाला तरीदेखील तो विहीरीतून बाहेर आला नाही म्हणून तेथील दोन स्थानिक नागरिक या विहीरीत उतरले. विहीरीतील गाळात ते तिघे अडकले. या सफाई कामगारांना वाचविण्यासाठी अग्निशमन दलाचे दोन कर्मचारीदेखील या विहीरीत उतरले होते. तेदेखील विहीरीतील गाळात अडकले. अग्निशमन दलाच्या इतर कर्मचाऱ्यांनी या पाचही जणांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर हे पाच मृतदेह या विहीरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अप्पर पोलीस आयुक्त डॉ प्रताप दिघावकर यांनी या पाच जणांना मृत घोषित केले. अनंत शेलार आणि प्रमोद वाकचौरे अशी या अग्निशमन कर्मचाऱ्यांची नावे आहेत. विहीरीतील गाळामुळे विषारी वायू तयार झाल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@