आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव; मराठीचा बोलबाला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Nov-2018
Total Views |



नवी दिल्ली : ४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवासाठी २ मराठी चित्रपटांची व ८ मराठी लघुचित्रपटांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित धप्पाआणि प्रतिमा जोशी दिग्दर्शित आम्ही दोघीया चित्रपटांची निवड इंडियन पॅनोरमासाठी करण्यात आली आहे. हा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यात होणार आहे.


या चित्रपट महोत्सवासाठी एकूण २१ लघुपटांची निवड करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ८ मराठी लघुपटांचा समावेश आहे. यामध्ये आदित्य जांभळे दिग्दर्शित खरवस’, मेधप्रणव पोवार दिग्दर्शित हॅपी बर्थ डे’, नितेश पाटणकर दिग्दर्शित ना बोले वो हराम’, प्रसन्ना पोंडे दिग्दर्शित सायलेंट स्क्रीम’, सुहास जहागिरदार दिग्दर्शित येस आय ॲम माऊली’, शेखर रणखांब दिग्दर्शित पाम्पलेट’, गौतम वझे दिग्दर्शित आई शपथ’, आणि स्वप्नील कपुरे दिग्दर्शित भर दुपारीया ८ लघुपटांचा समावेश करण्यात आला.

 

तसेच ४९ व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवामध्ये इंडियन पॅनोरमासाठी एकूण २२ चित्रपटांची निवड करण्यात आली. चित्रपट दिग्दर्शक राहुल रवेल यांच्या अध्यक्षेतखाली १३ सदस्यांच्या चित्रपट ज्यूरींनी या चित्रपटांची निवड केली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@