'या' कंपनीमध्ये झाला स्फोट; ११ जणांचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018
Total Views |

 

छत्तीसगड : भिलाई स्टील प्लान्टमध्ये गॅस पाइपलाईनची दुरुस्ती करत असताना झालेल्या स्फोटामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे तर १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी ११ च्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती आहे. यानंतर कंपनीच्या परिसरात मोठ्याप्रमाणात आग लागली. या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न चालू आहेत.

 

स्फोट झाला त्यावेळी कोक ओव्हन जवळ सुमारे २५ कर्मचारी गॅस पाईपलाईनची दुरुस्तीचे काम करत होते. यावेळी हा स्फोट झाला. मात्र हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियाद्वारे हा भिलाई स्टील प्रकल्प चालवला जातो. यापूर्वी देखील याठिकाणी २०१४ साली असाच स्फोट झाला होता. यामध्ये ६ जणांचा मृत्यू झाला होता.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@