शेअर बाजारावर रुपयाच्या पडझडीचे सावट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018
Total Views |
 

 

मुंबई : रुपयाने गाठलेला तळ, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती याचा थेट परिणाम शेअर बाजारावर झाल्याने सेन्सेक्स १७५ अंकांनी गडगडत ३४ हजार २९९ स्तरावर थांबला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४७ अंकांनी घसरुन १० हजार ३०१ वर स्थिरावला. बॅंक, ऑटो, एफएमसीजी आणि बांधकाम क्षेत्रातील शेअरमध्ये घसरण झाली.
 

दिवसभरात सेन्सेक्सने ३४ हजार २३३.५० अंकांचा तळ गाठला तर निफ्टी १० हजार २७९.३५ पर्यंत पोहोचला होता. सकाळी बाजार सुरू झाल्यानंतर ११ वाजताच्या दरम्यान सेन्सेक्स ७७.३८ अंकांनी तर निफ्टी २९.८५ अंकांनी घसरला. सेन्सेक्समधील टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एशिअन पेन्ट्स, आयसीआयसीआय बॅंक आणि बजाज ऑटो आदी शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टीमध्ये ३० शेअर घसरणीसह बंद झाले. निफ्टी ऑटो १.८६ टक्क्यांनी, निफ्टी रियल्टी १.०९ टक्क्यांनी आणि निफ्टी कन्झ्युमर १.०४ टक्क्यांनी घसरले. निफ्टी बॅंक ०.१४ टक्क्यांनी घसरला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा दबाव आणि डॉलरची होणारी मजबूती यांमुळे रुपयाने तिसऱ्यांदा ७४ चा स्तर पार केला. ३९ पैशांच्या मजबूतीनंतर तो ७४.२७ प्रतिडॉलरवर बंद झाला. यापूर्वी जागतिक बाजारात सकारात्मक संकेत मिळाल्यामुळे १७७ अंकांनी वधारुन ३४ हजार ६५२ अंकापर्यंत पोहोचला.

 

मिडकॅपमध्ये तेजी : एचडीएफसी, अदानी पोर्ट, वेदांता, टाटा स्टील, कोल इंडीया, येस बॅंक, सन फार्मा, विप्रो, टीसीएस, एलएण्डटी, इन्फोसिस, कोटक बॅंक, पावरग्रीड आणि हिरो मोटोक्रॉप शेअरमध्ये वाढ झाली.

 

टाटा मोटरची सहा वर्षातील खराब कामगिरी : लग्झरी कार जॅगवार आणि लॅण्ड रोवर निर्माती कंपनी असलेली टाटा मोटारचा शेअर ९.४० टक्क्यांनी घसरून १९२.७० रुपयांवर बंद झाला. वार्षिक अहवालानुसार जेएलआरची विक्री १२.३ टक्क्यांनी कमी झाली असून ५७ हजार ११४ युनिटवर आली आहे. जेएलआर विक्रीत घट झाल्यामुळेही शेअरवर परिणाम झाला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@