राज्य मंत्रिमंडळाचे महत्वपूर्ण निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018
Total Views |


 

मुंबई : सातारा जिल्ह्यातील तारळी मोठा पाटबंधारे प्रकल्पासाठी १६१०.३२ कोटी रुपये देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रकल्पाला दिलेल्या भरगोस निधीमुळे नव्याने ८ ठिकाणी सिंचन उपसा योजना राबवण्यात येणार आहे. यामुळे तारळी खोऱ्यातील ६५०७ हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून खटाव, माण तालुक्यातील ८८७६ हेक्टर अवर्षणग्रस्त सिचंन क्षेत्राला याचा लाभ होणार आहे. यासोबतच या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. कोणते आहेत हे निर्णय यावर एक नजर...

 

राज्य मंत्रिमंडळाने घेतलेले निर्णय

 

१. महाराष्ट्र मूल्यवर्धिीत कर अधिनियमातील कलमामध्ये सुधारणा करण्यात येणार.

 

२. निर्धारण आदेश नव्याने पारित करण्यासाठी अतिरिक्त 6 महिन्यांचा कालावधी मिळणार.

 

३. परभणी जिल्ह्यातील एरंडेश्वर येथील जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीची बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यासाठी निवड करण्यात आली.

 

४. नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत औषध उत्पादक, विक्रेते तसेच मान्यताप्राप्त चाचणी प्रयोगशाळांना दंड आकारण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली.

 

५. सहकारी संस्थांतील अधिकारी-कर्मचारी तसेच पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू राहण्यासह या संस्थांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक सहकारी संस्थेस शिक्षण निधी देण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्यात येणार.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@