आयसीसीच्या क्रमवारीत कोहली बुमराह न. १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018
Total Views |


 

 


दुबई: आशियाई मालिकेत विराट कोहलीला खेळवले नसले तरीही भारताचा कर्णधार विराट कोहली हा आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. तर जसमीत बुमराहने सुद्धा आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या व्यतिरिक्त भारत मात्र अजूनही क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यामध्ये १२२ गुण जमा आहेत, तर इंग्लंड १२७ गुणांसह अव्वल स्थानी आहे.

  

भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या खात्यामध्ये ८८४ गुण जमा असून तो पहिल्या क्रमांकावर आहे. तर रोहित शर्मा ८४२ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचा सलामीवीर शिखर धवन हा पाचव्या स्थानावर आहे. त्याच्या खात्यामध्ये ८०२ गुण जमा आहेत. विशेष म्हणजे विराट कोहली हा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत सुद्धा अव्वल स्थानावर आहे.

 

भारताचा यॉर्कर किंग जसमीत बुमराह याला सुद्धा आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश आलेले आहे. त्याच्या खात्यावर ७९७ गुण जमा आहेत. तर भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव हा ७०० गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आशियाई स्पर्धेत भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या तिन्ही संघांना विजयासाठी टक्कर देणाऱ्या अफगाणिस्तान संघाने पहिल्या १०मध्ये उडी मारली आहे. ६७ गुणासहित ते १०व्या क्रमांकावर आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@