लुबान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशात 'हायअलर्ट'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : ओडिशातील किनारी भागात मुसळधार तसेच अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याने ओडिशा सरकारने यंत्रणांना हायअलर्ट जारी केले आहेत. अरबी समुद्रातील पश्चिम भागात लुबान चक्रीवादळ घोंघावत असल्याने ओडिशात याचा परिणाम होणार असल्याने हे अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने आपत्कालीन यंत्रणेतील कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या असून जिल्हा आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

 
 
भारतीय हवामान विभागाने याविषयी ट्विटरवरून माहिती दिली. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,हे चक्रीवादळ सध्या अरबी समुद्रातील पश्चिम भागात घोंघावत आहे. ताशी ७ किलोमीटर वेगाने ते पश्चिम उत्तर दिशेकडे सरकले असून येत्या पाच दिवसात येमेन आणि ओमानच्या दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता आहे. यामुळे ओडिशाच्या काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात देखील चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे. 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@