सोनेखरेदीदारांसाठी सरकारची गुंतवणूक योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2018
Total Views |
 
 

मुंबई : केंद्र सरकारतर्फे १५ ऑक्टोबरपासून सुवर्ण बॉण्ड गुंतवणूक योजनेची सुरुवात केली जाणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने सोमवारी ही माहिती जाहिर केली. यात पाच हप्त्यांमध्ये फेब्रुवारी २०१९पर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या बॉण्डची खरेदी सरकारी बॅंका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडीया लिमिटेड (एसएचसीआयएल), प्रमुख पोस्ट ऑफिस, शेअर बाजारात एनएसई आणि बीएसई आदी मंचावर या बॉण्डची खरेदी करता येईल. १५ ऑक्टोबरला सुरू होणारी विक्री १९ ऑक्टोबरपर्यंत खुली राहणार आहे. २३ ऑक्टोबरला बॉण्ड गुंतवणूकदारांसाठी जारी केला जाईल. त्यानंतरचा दुसरा हप्ता ५ ते ९ नोव्हेंबर, तिसरा २४ डिसेंबर ते २८ डिसेंबर, चौथा आणि पाचवा हप्ता अनुक्रमे १४ ते १८ जानेवारी व ४ ते ८ फेब्रुवारीपर्यंत भरायचा आहे. या योजनेची सुरुवात २०१५ मध्ये झाली होती. यापूर्वी २०१६मध्ये बॉण्ड्ची विक्री सुरू झाली होती. सणासुदीच्या दिवसात सोन्याची वाढती मागणी लक्षात घेऊन ही योजना राबवली जाते.

 

या योजनेत किमान एक ग्रॅमपासून ते पाचशे ग्रॅमपर्यंतचे बॉण्ड उपलब्ध आहेत. अशाप्रकारे एका व्यक्तिला कमाल ४ किलो आणि हिंदू अविभाज्य कुटूंबाला (एचयुएफ) २० किलोपर्यंतसाठी गुंतवणूक करता येते. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयानुसार, केवळ २० हजारांपर्यंतच रोख रक्कम भरता येते. त्याशिवाय धनादेश, मागणी धनाकर्ष (डीडी), ई-बॅंकींगद्वारे ही रक्कम भरता येऊ शकते. या योजनेत गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या खरेदीचे सर्व नियम लागू होतात. गुंतवणूकदारांना त्यांचा पॅन क्रमांक देणे आवश्यक असेल, अशी माहिती आरबीआयने नमूद केली आहे.

 
 
      माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
 
@@AUTHORINFO_V1@@