गुजरातमधून ५० हजार उत्तर भारतीयांचे पलायन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018
Total Views |

गुजरातमध्ये राबवली जातेय 'यूपी-बिहारी भगाओ' मोहीम



 
 

अहमदाबाद : साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्यांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचारानंतर गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच दिवसांत येथील परप्रांतीयांवर ४२ हल्ले झाले आहेत. यामुळे गुजरातमधील उत्तर भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून, जवळपास ५० हजार नागरिकांनी गुजरात राज्यातून स्थलांतर केले आहे. याचा सर्वाधिक फटका साबरकांठा, अहमदाबाद, मेहसाना, अरावली, पाटण, गांधीनगर या भागातील नागरिकांना बसला आहे. याप्रकरणी गुजरात पोलिसांनी ३४२ जणांना अटक केली आहे.

 

काय आहे प्रकरण

 

गुजरातच्या साबरकाठा जिल्ह्यात एका १४ महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणी मूळचा बिहारचा असलेल्या रविंद्र साहू या आरोपीला अटक करण्यात आली होती. आरोपी परप्रांतीय असल्याचे उघड होताच गुजरातमध्ये 'यूपी-बिहारी भगाओ' अशी मोहीमच सुरू झाली. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांच्या घरावर हल्ले करण्यात आले. त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये घबराट निर्माण होऊन ते गुजरात सोडून जात आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@