भारतीय वायूसेना दिनाच्या सोहळ्याला सचिनची उपस्थिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
हिंडन : आज ८६ व्या भारतीय वायुसेना दिनानिमित्त गाझियाबादमधील हिंडन येथे भारतीय वायुसेनेने शक्तिप्रदर्शन केले. वायुसेनेच्या जवानांनी परेड सादर केली. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी वायुसेनेच्या या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी सचिन यांच्या पत्नी अंजली तेंडुलकरही त्यांच्यासह उपस्थित होत्या. वायुसेनेच्या परेडला सचिन यांनी सॅल्युट केला. तसेच वायुसेनेला स्थापनादिनाच्या शुभेच्छाही दिल्या. सचिन तेंडुलकर यांनी यावेळी वायुसेनेचा निळा गणवेश परिधान केला होता. २०१० साली सचिन तेंडुलकर यांना वायुसेनेकडून ‘मानद ग्रुप कॅप्टन’ ही पदवी बहाल करण्यात आली होती.
 
 
 
 
 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून वायुसेनाला व वायूसेनेतील जवानांच्या कुटुंबियांना वायुसेना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@