'त्या' आयएसआयच्या संशयित एजंटला बेड्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Oct-2018
Total Views |


 

 

नागपूर: ब्राह्मोस क्षेपणास्त्रांसंबंधीची माहिती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवत असल्याच्या संशयावरून निशांत अगरवाल नामक एजंटला अटक केली आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र एटीएस यांनी मिलिटरी इंटेलिजंट अधिकाऱ्यांच्या साहाय्याने ही कारवाई केली आहे. ब्राह्मोस एअरोस्पेस सेंटरजवळूनच अगरवालला एटीएसने अटक केली. त्याला ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अन्वये अटक करण्यात आली आहे.

 

निशांत अगरवाल हा गेली ४ वर्षे नागपूरमधील ब्राह्मोस एरोस्पेस सेंटरमध्ये काम करत होता. हे केंद्र भारत आणि रशियामार्फत संयुक्तपणे चालवले जाते. गेल्या वर्षी येथे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या प्रक्रियेचं परीक्षण करण्यात आलं होतं. अद्याप सरकार आणि एरोस्पेस सेंटर दोघांनी या प्रकरणी कोणतीही माहिती वा स्पष्टीकरण दिलेलं नाही. विशेष म्हणजे निशांत अगरवालला २०१७ - १८ चा तरुण शास्त्रज्ञ पुरस्काराने गौवरविण्यात आले होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@