कोळसे-पाटील यांवर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : तथाकथित पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणारे व त्या नावाखाली जातीयवादी भूमिका घेणारे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कोळसे-पाटील यांच्यावर एका महिला पत्रकाराशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला असून दुसरीकडे कोळसे यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत या प्रकरणात मला गोवण्यासाठी हादेखील रा. स्व. संघाचाच कट असल्याचा उलटा आरोप केला आहे.
 

काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पत्रकार संध्या मेनन यांनी ट्विटरद्वारे महिला पत्रकारांना कोळसे-पाटील यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीला वाचा फोडली आहे. तसेच लेखक किरण नगरकर, छायाचित्रकार पाब्लो बार्थलोम्यू यांच्यावरही महिला पत्रकारांशी गैरवर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. महिला पत्रकारांना कशी वागणूक दिली जाते व कशाप्रकारे लैंगिक गैरवर्तन केले जाते, याबाबत ट्विटरवरून ट्विट करताना मेनन यांनी एका महिला पत्रकाराला बी. जी. कोळसे पाटील यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीबाबत माहिती दिली आहे. तसेच, हे ट्विट करत असताना मेनन यांनी त्यांचे त्या महिला पत्रकारामध्ये मेसेजद्वारा झालेले संभाषणदेखील त्या महिला पत्रकाराचे नाव वगळून शेअर केले आहे.

 

बी. जी. कोळसे-पाटील हे सातत्याने रा. स्व. संघ तसेच हिंदुत्वविरोधी विचार अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन मांडण्यासाठी तसेच उघड उघड जातीयवादी भूमिका घेण्यासाठी ओळखले जातात. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण घडण्यास कारणीभूत ठरल्याचा आरोप असणाऱ्या व पुण्यातील शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेतही कोळसे-पाटील यांचा सक्रीय सहभाग होता. आता एका महिला पत्रकाराने कोळसे यांनी आपल्याशी लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याने माजी न्यायमूर्ती असलेले कोळसे-पाटील सध्या चांगलेच अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे, आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत हेदेखील रा. स्व. संघाचेच कारस्थान असल्याचे कोळसे-पाटील यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणामुळे फेसबुक-ट्विटर आदी समाजमाध्यमांतूनही कोळसे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

 
  

काय आहे आरोप?

 

संध्या मेनन यांनी शेअर केलेल्या त्या महिला पत्रकाराच्या संभाषणानुसार, सदर पत्रकार कोळसे यांची मुलाखत घेण्यास त्यांच्या घरी गेली होती. बाहेर गर्दी असल्यामुळे मुलाखतीसाठी ते आत घरात बसले. मुलाखत संपल्यावर कोळसे यांनी चक्क तिची शर्टची कॉलर पकडत तू तुझ्या कुर्त्याचे वरचे बटण उघडे का ठेवतेस, असा प्रश्न केला. यामुळे ती महिला पत्रकार हादरून गेली. कोळसे-पाटील यांनी त्यानंतर तिची क्षमा मागितली. आपण मित्र आहोत, म्हणून मी तसे सांगितल्याची सारवासारव केली. त्यानंतर आपल्यात जे घडले ते बाहेर कोणालाही सांगू नकोस, अन्यथा मी संपून जाईन, अशा शब्दांत कोळसे-पाटील यांनी त्या महिला पत्रकाराकडे अक्षरशः विनवण्याही केल्या. अशाप्रकारे संध्या मेनन यांनी महिला पत्रकारांशी कसे गैरवर्तन केले जाते, याबाबत वाचा फोडल्याने मोठी खळबळ उडाली असून कोळसे-पाटील यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@