मोदींकडून उत्तराखंड सरकारचे कौतुक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
उत्तराखंड : ‘डेस्टिनेशन उत्तराखंड समिट’ या उत्तराखंड येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडचे सरकारचे भरभरून कौतुक केले. उत्तराखंड ही देवभूमी असून तेथे शेती, सेंद्रीय शेती आणि फूड प्रोसेसिंग या क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध आहेत असे त्यांनी म्हटले. तसेच ‘उत्तराखंड सरकार हे त्यांच्या कामामुळे राज्यभरातील जनतेशी जोडलेले आहे.’ असे म्हणत पंतप्रधानांनी उत्तराखंड सरकारचे विशेष कौतुक केले.
 
 
 
 

उत्तराखंडला उत्तम निसर्गसौंदर्य लाभले आहे. तसेच उत्तराखंडला थोर संस्कृतीही लाभली आहे. एक पर्यटन क्षेत्र म्हणून उदयास येण्यासाठीची क्षमता उत्तराखंडमध्ये आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला घर, वीजपुरवठा, शुद्ध इंधन आणि सुयोग्य वैद्यकीय सुविधा आणि बँकिंगचा अधिकार मिळावा यासाठी आम्ही अथक परिश्रम करत आहोत. असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. उत्तराखंड समिटसाठी जगभरातून आलेल्या गुंतवणुकदारांना पाहून मला आनंद होत आहे. यामुळे उत्तराखंडच्या विकासाचा मार्ग आणखी सुकर होईल.” असेही मोदींनी म्हटले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@