मुंबई तापली; तापमान ३७ अंशावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |


 

 

मुंबई: मुंबईमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाने तडाखा द्यायला सुरुवात केली आहे. शनिवारी सांताक्रूझ येथे ३७.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे ३६.६ अंश सेल्सिअस तापमान होते. किमान तापमान कुलाबा येथे २७ अंश, तर सांताक्रूझ येथे २५.५ अंश सेल्सिअस होते. यामुळे संसर्गजन्य तापांसह विविध प्रकारच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

 

शनिवारी नोंदवण्यात आलेले तापमान गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाचे तापमान आहे. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा पाच अंशांनी अधिक आहे. या आधी २०१५ मध्ये ऑक्टोबर महिन्यात पारा ३८.६ अंशांवर पोहोचला होता, तर २०१४ मध्ये ३७.२ या तापमानाची नोंद झाली होती. मात्र हे तापमान ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात इतके तीव्र झाले होते. यामुळे विविध प्रकारच्या त्वचारोगांनीही मुंबईकरांची डोकेदुखी वाढवली आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@