मिग- २९ लढाऊ विमाने केली अपग्रेड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |


 

 

जालंधर: कारगिल युद्धामध्ये खारीचा वाटा असणारे मिग २९ या विमानांचे अपग्रेड करणार आहेत. यामुळे विमानाची मारक क्षमता वाढली असल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या अपग्रेडेशन नंतर ही विमाने हवेतच इंधन भरू शकणार आहेत. तसेच या विमानातून एकावेळी अनेक दिशांना मारा करता येऊ शकतो. ही विमानं चीन आणि पाकिस्तानवर नजर ठेवण्यासाठीही महत्त्वाची आहेत, अशी माहिती हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर तैनात असलेल्या फ्लाइट लेफ्टनंट करन कोहली यांनी दिली.

 

भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी केल्यास दुश्मनांच्या विमानाला रोखण्यासाठी केवळ ५ मिनिटांत उड्डाण करण्याची क्षमता या लढाऊ विमानाला मिळालेली आहे. जुन्या विमानामध्ये केवळ बटने होती. आता डिजिटल डिस्प्ले, बहुउपयोगी स्क्रीन आणि काचेची कॉकपिटही देण्यात आली आहे. विमान उड्डाणाची रेंजही वाढली आहे. गेल्या आठवड्यात हवाई दलाच्या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेल्या 'मिग-२९' विमानांची प्रत्यक्षिकं सादर करण्यात आली.

 

१९९९ च्या कारगिल लढाई दरम्यान 'मिग-२९' विमानांनी पाक सैन्याला पराभूत करण्यात मोठी कामगिरी बजावली होती. ही लढाऊ विमाने रशियाकडून १९८० मध्ये खरेदी करण्यात आली होती. हवाई दलाचे अदमपूर विमानतळ हे पाकिस्तानपासून १०० किमी आणि चीनपासून २५० किमी अंतरावर आहे. यामुळे सामरिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या अदमपूर विमानतळावर अपग्रेड केलेली 'मिग-२९' विमानं तैनात करण्यात आली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@