उदयनराजे कि रामराजे ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |

 


 
 
लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादीत अंतर्गत कलह
 

मुंबई : राजकीय आखाड्यात चर्चेचा विषय ठरलेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे नेमकी कोणाला उमेदवारी द्यावी, याबाबत पक्षात चढाओढ सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात खासदार उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर किंवा अन्य तिसराच उमेदवार या निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णय पवारच घेणार असले तरीही उमेदवारी मिळवण्यासाठी उदयनराजे राजकीय दबाव आणण्याच्या तयारीत आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात रविवारी सातारा लोकसभा मतदार संघाच्या तिकिटासंदर्भात निर्णय घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. बैठकीला खासदार उदयनराजे उशीरा पोहोचले. बैठकीतील घडामोडी त्यांच्या कार्यकर्त्यांनीच त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती उदयनराजे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान राष्ट्रवादीतील एका गटाने उदयनराजेंना उमेदवारी देण्यासाठी विरोध दर्शवला आणि रामराजे निंबाळकर यांचे नाव सुचवले. तिकिट वाटपावरून त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी दिसू लागली आहेबैठक संपल्यानंतर उशीरा पोहोचलेल्या उदयनराजेंनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगितले. सातारा लोकसभा मतदार संघातून खासदारीसाठी इच्छुक असल्याचे ते म्हणाले. मात्र, पवार साहेबच अंतिम निर्णय घेतील. पवारांचे इतर पक्षात जसे मित्र आहेत, तसे माझेही आहेत, असे सुचक वक्तव्या त्यांनी यावेळी केले.

 

राजेंना रस्ता सापडेना : मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचा रस्ता माहित नसल्याने कार्यकर्ते त्यांना कार्यालयात पोहोचण्यास मार्गदर्शन करत होते. अखेर वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याची सबब त्यांनी दिली.

मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात येण्यासाठी उशीर झाला. पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन मी माझी इच्छा व्यक्त केली आहे. अंतिम निर्णय तेच घेतील. त्यांचे जसे इतर पक्षात मित्र आहेत. तसे माझेही मित्र इतर पक्षात आहेत.”

- उदयनराजे भोसले 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 


@@AUTHORINFO_V1@@