राज्यात हुक्का पार्लरवर बंदी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |


 

मुंबई: राज्यात हुक्का पार्लरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नशेच्या वस्तू लहान मुलांपर्यंत पोहोचविण्यात येत होत्या. शिवाय डिसेंबर २०१७मध्ये कमला मिल कंपाऊंडला आग लागल्यानंतर राज्यातील हुक्का पार्लरवर बंदी आणण्यासाठी राज्य सरकारने कायदा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. हुक्का पार्लर बंदी लागू करणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य आहे. याआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे.

 

गेल्यावर्षी कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेनंतर राज्य सरकारने राज्यातील सर्व हुक्का पार्लरवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेत यासंदर्भाचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मांडले होते. या विधेकाला आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. शिवाय याबाबतचे विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मांडण्यात आले होते. या विधेयकावर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केल्याने या विधेकाला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कुठेही हुक्का पार्लर चालवण्यास बंदी येणार आहे.

 

राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांचे आभार

 

हुक्का पार्लरवर पूर्णपणे बंदी आणण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. दोन वर्षांपूर्वी मी विधानसभेमध्ये खाजगी विधेयक सादर करून हुक्का पार्लरवर बंदीची मागणी केली होती. ते विधेयक विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर झाले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यावर शिक्कामोर्तब केले. यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे.” असे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
@@AUTHORINFO_V1@@