हैद्राबाद विद्यापीठावर अभाविपचा झेंडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Oct-2018
Total Views |

 

 

 
 
 
हैद्राबाद : हैद्राबाद विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात, अभाविपने ऐतिहासिक विजय मिळवला. विद्यार्थी संघटनेच्या सर्वच्या सर्व सहा जागांवर दणदणीत विजय मिळवत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या या बालेकिल्ल्यात अभाविपने जोरदार मुसंडी मारली.
 

हैद्राबाद विद्यापीठ हा कम्युनिस्ट संघटनांचा बालेकिल्ला मानला जात होता. कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (एसएफआय) येथे प्राबल्य होते. परंतु, नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदासह उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सांस्कृतिक सचिव आणि क्रीडा सचिव आदी सहाच्या सहा जागा अभाविपने जिंकत डाव्यांना जोरदार तडाखा दिला. अभाविपच्या आरती नागपाल या मानसशास्त्रात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत एसएफआयच्या एराम नवीन कुमार याचा ३३४ मतांनी दारूण पराभव केला. तसेच, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सांस्कृतिक सचिव आणि क्रीडा सचिव या पदांवर अनुक्रमे अमित कुमार, धीरज संगोजी, प्रवीण चौहान, अरविंद कारथा आणि निखील राज यांनी विजय मिळवला.

 

भविष्याची चुणूक?

 

विद्यापीठातील पीएचडीचा विद्यार्थी रोहित वेमुला याच्या २०१६ मध्ये झालेल्या मृत्युनंतर विद्यापीठ देशभरात चर्चेत आले होते. एसएफआयसह अन्य डाव्या संघटनांचे येथे असलेले मजबूत वर्चस्व पाहता अभाविपची वाट या निवडणुकीत भलतीच खडतर होती. मात्र, अभाविपने येथे एकहाती विजय मिळवत सर्वांनाच चकित केले. नुकत्याच झालेल्या दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकीतही अभाविपने मोठे यश मिळवले होते. आतापर्यंत डाव्या संघटनांचे वर्चस्व असणाऱ्या विविध विद्यापीठांत अभाविपने मारलेली मुसंडी, ही भविष्याची एक चुणूकच असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@