'या' पाच राज्यात होणार विधानसभा निवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 


नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांचा समावेश आहे.  मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्याचबरोबर या चारही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार मध्यप्रदेश आणि मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर तर राजस्थान आणि तेलंगणामध्ये ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. यातील पहिल्या टप्पा १२ नोव्हेंबर तर दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल.

 

आजपासून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराम या चार राज्यांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली असून ११ डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ 
@@AUTHORINFO_V1@@