‘शिवशाही’च्या स्लीपर बस तोट्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 


मुंबई : खाजगी बसच्या तुलनेत जादा भाडे आणि गैरसोयीच्या मार्गांमुळे एसटीच्या ‘शिवशाही’ स्लीपर बस तोट्यात धावत आहेत. सध्या केवळ दहा टक्के प्रवासी घेऊन धावण्याची वेळ या बसेसवर आली आहे. काही महिन्यांपूर्वी मोठा गाजावाजा करून ही बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, ही बस आता तोट्यात धावत असल्याचे दिसून येत आहे.

 

एसटीच्या ‘शिवशाही’ स्लीपर बसला प्रवाशांकडून अतिशय अल्प प्रतिसाद मिळत आहे. सध्या राज्यभरात ‘शिवशाही’च्या 50 एसी स्लीपर बसेस चालवण्यात येत असून यासाठी निवडलेल्या मार्गांमुळे प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली आहे, तर दुसरीकडे खाजगी कंपन्यांच्या तुलनेत या बसेसचे दरही अधिक असल्यामुळे प्रवाशांनी खाजगी बसेसचा मार्ग स्वीकारला आहे.

 

मुंबई ते कोल्हापूर, जळगाव, परळी, अक्कलकोट, आंबेजोगाई, पुणे ते नांदेड, लातूर ते कोल्हापूर, औरंगाबाद ते मुंबई सेंट्रल यासह अन्य मार्गांवर या सेवा पुरविण्यात येत आहे. यासाठी आकारण्यात येणारे भाडे हे एक हजार रुपयांपेक्षा अधिक आहे. तसेच या ठिकाणी जाण्यासाठी खाजगी कंपन्या 500 ते 600 रुपये आकारतात. त्यामुळे प्रवाशांनीही खाजगी बसेसनांच पसंती दिली आहे. दरम्यान, यामध्ये आजच्या घडीला केवळ दहा प्रवासीच यातून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. किमान 11 प्रवासी मिळाल्यास ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर ही बस चालवता येणे शक्य होणार आहे.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@