मांडूळ विक्री करणार्‍यांना अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |



मुंबई: काळी जादू आणि औषधी पदार्थांच्या विक्रीसाठी मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्या त्रिकुटास बोरिवली गुन्हे अन्वेषण शाखा आणि वन्यजीव विभाग यांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक मांडूळ जातीचे वन्यसर्प जप्त करण्यात आले आहे. उमेश दिवेचा (५०), मुक्तार अहमद(३८), वासुदेव वर्मा(३५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. बोरिवली येथे छापा घालून मांडूळची विक्री करण्याच्या तयारीत असणाऱ्या तीनजणांना अटक केली आहे.

 

अंधश्रद्धेसाठी ते या मांडूळाची विक्री करणार होते. परंतु, याबाबतची माहिती मिळताच वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, झअथड, अम्मा केअर फाऊंडेशन आणि वन्यजीव विभागाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. यामध्ये तीनजणांना अटक केली तसेच त्यांच्याकडून एक मांडूळ जप्त करण्यात आले आहे. याबाबत पुढील तपास सुरू असून सखोल तपास करून पुढील कारवाई केली जाईल, असे मानद वन्यजीव रक्षक सुनीष कुंजू यांनी दिली.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@