रविवारी मेगाब्लॉक नाही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |

 


 
 
 
मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज शनिवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे उद्या रविवारी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही. मध्य रेल्वेवर आज शनिवारी मध्यरात्री १ वाजल्यापासून ते उद्या रविवारी पहाटे ६ वाजेपर्यंत माटुंगा ते मुलुंड दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकावरही याचा परिणाम होणार आहे. दादर-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, सीएसएमटी-पुणे इंद्रायणी एक्सप्रेस आणि सीएसएमटी भुसावळ पॅसेंजर या लांब पल्ल्याच्या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
 

‘या’ लोकलच्या फेऱ्या होणार रद्द

विद्याविहार येथून सुटणारी सकाली ५.३९ ची कुर्ला कल्याण लोकल

दादर येथून सुटणारी सकाळी ६.४८ ची कल्याण लोकल

दादर येथून सकाळी ८.०७ वाजता सुटणारी कल्याण लोकल विद्याविहार येथून सकाळी ८.२१ ला सुटेल.

 

हार्बर मार्गाची स्थिती

 

हार्बर मार्गावर सीएसएमटी – कुर्ला/माहीमपर्यंत दोन्ही मार्गांवर आज शनिवारी मध्यरात्री १.२० वाजल्या पासून ते पहाटे ६.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी – वडाळा ते पनवेल-बेलापूर-वाशी मार्गावर पहाटे ४.३२ ते ६.४६ पर्यंत सेवा खंडीत करण्यात येणार आहे. तसेच पनवेल- बेलापूर-वाशी ते सीएसएमटी पर्यंत पहाटे ४.०३ ते ५.५९ पर्यंत लोकल सेवा खंडीत असेल. सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरीपर्यंत पहाटे ४.२६ ते ६.२१ या वेळेत लोकल सेवा खंडीत राहील. वांद्रे-अंधेरी ते सीएसएमटीपर्यंत पहाटे ५.१३ ते ६.१६ पर्यंत लोकल सेवा खंडीत असेल. सीएसएमटी-कुर्ला आणि कुर्ला-पनवेल मार्गावर विशेष लोकल फेऱ्या असतील.

 

'पश्चिम रेल्वे' वरी गाड्या जलद मार्गावर

पश्चिम रेल्वे मार्गावर आज शनिवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० पर्यंत मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ स्थानकापर्यंत दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यान विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या महालक्ष्मी, लोअर परे, प्रभादेवी, माटुंगा या रेल्वे स्थानकात थांबणार नाहीत. चर्चगेटच्या दिशेने येणाऱ्या लोकल गाड्या देखील माहीम, माटुंगा, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी रेल्वे स्थानकात थांबणार नाहीत. तसेच या लोकल लोअर परे, माहीम, खार स्थानकात दोनदा थांबतील. मेगाब्लॉक कालावधीत चर्चगेट येथून सुटणाऱ्या लोकल गाड्या महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रेल्वे स्थानकात थांबणार नाहीत. चर्चगेटच्या दिशेकडील लोकल गाड्या लोअर परे, माहीम रेल्वे स्थानकात थांबणार नाहीत. या मेगाब्लॉकमुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अडचण होणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@