इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्याकरिता विशेष तंत्रज्ञान धोरणाची गरज : नितीन गडकरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 


मुंबई : इंटरनेटचे लोकशाहीकरण करण्याकरिता विशेष तंत्रज्ञान धोरणाची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करताना केंद्रीय भूपृष्ठ आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी इंटरनेट क्रांतीचा सर्वाधिक फायदा विविध भारतीय भाषांचा वापर करणाऱ्या समाजाला होईल, असे सांगितले. ‘बोल : लव युअर भाषा’ याकार्यक्रमात बोलत होते. त्यांनी व्यवसायवृद्धीकरिता भारतीय भाषांना ‘डिजिटल स्पेस’ बनविण्यावरदेखील जोर दिला.

 

भारतीय भाषांमधील डिजिटल कंटेंट व्यावसायिक पातळीवरही सुसंगत कसा बनवता येईल आणि त्याचवेळी तो देशभरातील प्रेक्षकांपर्यंत सहजसोप्या पद्धतीने कशाप्रकारे पोहोचविता येईल, यावर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात बोलताना ‘गुगल इंडिया’चे उपाध्यक्ष राजन आनंदन यांनी सांगितले की, “भारतीय भाषांमध्ये व्यवसायाची प्रचंड क्षमता आहे. खरी गरज या क्षमतांना निष्कर्षात बदलण्याकरिता प्रयत्न करण्याची आहे. 2021 पर्यंत भारतीय भाषांमध्ये जाहिरातीचा बाजार सुमारे सहाशे कोटींपर्यंत पोहोचेल. इंटरनेटवर भारतीय भाषांमध्ये सामग्री व्यवसाय वाढीसाठी प्रचंड क्षमता आहे. भारतात यु-ट्यूबवर पाहण्यात येणारी 95 टक्के सामग्री ही इंग्रजीमधील नसते,” यावरूनच हे सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले.

 

या चर्चासत्रात अनेक विषयांचा समावेश होता. तामिळ, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमधील जाहिरातींना इंग्रजी जाहिरातींचे प्राबल्य असलेल्या बाजारपेठेत ग्राहक आहेत का? इतर प्रादेशिक भाषांबरोबरच हिंदीलाही ब्रॅण्ड्स/एजन्सी/मार्केटर्सकडून फारसे हितावह मानले जात नाही का? वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी बनलेली जाहिरात कितीवेळा त्यांच्या मातृभाषेत दिसते? या आणि अशा इतर प्रश्नांचा वेध यावेळी घेण्यात आला.

 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@