शरद पवार कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |

मुंबईतील आगामी लोकसभा निवडणुकीच्या आढावा बैठकीत खुद्द पवारांचा खुलासा



 
 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. २०१९ च्या लोकसभा निवडणूक तयारीसाठी जागांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत आढावा बैठक सुरु आहे. त्यावेळी त्यांनी हे स्पष्ट केले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पवार रिंगणात उतरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तसेच प्रसारमाध्यमांमध्ये होती. मात्र आज याबाबतीत स्वतः पवार यांनी खुलासा केल्याने या चर्चेतील हवाच निघाली आहे. त्याचबरोबर मावळ लोकसभा उमेदवारीसाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीला देखील स्वतः पवार अनुकूल नसल्याने, याचर्चेला देखील ब्रेक लागला आहे.

 

"मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही, माझ्या नावाची चर्चा करु नकाअसे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. शरद पवारांनी २०१४ मध्येच कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र हे तर्क वितर्क कुठू आले, कोणी या बातम्या पसरवल्या हे आम्हाला माहित नाही. आज पवारांनी स्पष्ट सांगितले की, ते जनतेमधून कोणतीही निवडणूक लढवणार नाही. त्याने या चर्चा थांबवलेल्याच बऱ्या.असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@