दुर्दैवी; बस दरीत कोसळून २० जण ठार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |

जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील घटना



 
 

श्रीमगर : जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात बस दरीत कोसळून २० जणांचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून ही बस दरीत कोसळली. या बसमध्ये एकूण ३३ जण असल्याची माहिती आहे. यातील २० जणांचा मृत्यू झाला असून इतर १३ जण जखमी आहेत. घटनेची माहिती मिळताच लष्कराच्या जवानांनी बचाव कार्याला सुरुवात केली, त्यामुळे इतरांचे प्राण वाचले आहेत.

 

१० जखमी प्रवाशांना उधमपुर येथील लष्कराच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हवाई मार्गाने या दवाखान्यात पोहचवण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर इतर जखमींना देखील दवाखाण्यात देण्यासाठी हेलिकॉप्टर्सची सोय करण्यात येत आहे. दरम्यान, मृत नागरिकांची ओळख पटविण्याचे काम चालू असून त्यांना पोस्ट मार्टमला पाठवण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@