‘विवेक राष्ट्र सेवा समिती’च्या कलाकारांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 

खानिवडे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बांबू -संशोधन, प्रशिक्षण, हस्तकला व कला केंद्राच्या आणि ग्रंथालय इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्यपाल सी . विद्यासागर राव यांच्या हस्ते नुकताच पार पडला. या सोहळ्यात पालघर जिल्ह्यातील ‘विवेक’ संचालित ‘राष्ट्र सेवा समिती’ ग्राम भालिवली येथील बांबू हस्तकला केंद्रातील प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आदिवासी कलाकार महिलांचा प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अन्न नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक तसेच प्रमुख अतिथी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर, संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के. रेड्डी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

 

ग्रामीण आदिवासी महिलांना रोजगाराचे उत्तम साधन उपलब्ध व्हावे म्हणून ‘राष्ट्र सेवा समिती’मार्फत मागील चार वर्षांपासून पारंगत प्रशिक्षकांकडून ४५ दिवसांचे बांबू हस्तकलेचे विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत १०० हून अधिक महिला प्रशिक्षण घेऊन घरची व शेतीची कामे सांभाळून रोजगार मिळवत आहेत. यामधून महिन्याकाठी त्यांना पाच ते आठ हजारांचे उत्पन्न मिळत असल्याने त्यांच्या संसाराला चांगला हातभार लागत आहे. त्यामुळे आपले जीवन स्वावलंबी झाले असून नामांकितांकडून हा सन्मान मिळाल्यामुळे सर्वच स्तरातून मानसन्मान प्राप्त होत असल्याचे अंकिता सांबरे, वैशाली दांडेकर व संजना सांबरे या महिलांनी सांगितले. सदर प्रशिक्षणाबाबत व बांबू हस्तकलेच्या वस्तूंबाबत अधिक माहितीसाठी ७७९८७११३३३ (प्रगती भोईर) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन समिती मार्फत करण्यात आले आहे .

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@