दुसर्‍यांनी का सोडवायचे आपले प्रश्न?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018   
Total Views |

 

 

 
लठ्ठपणा कमी करण्यासाठीचे उपाय सांगत सर्वदूर भ्रमंती करणार्या एका डॉक्टरांचे एक विधान फार महत्त्वाचे अन्मोलाचेही आहे. ते म्हणतात, मुळात लठ्ठपणा अस्तित्वात आहे, हे एकदा मान्य करून टाका. आपल्या समजुतीनुसार ती समस्या असलीच तरमाझीआहे. इतर कुणीतरी ती सोडवून देईल, असे सोपे उत्तर या समस्येवर नाहीच. प्रश्नआपलाअसेल, तर त्याचे उत्तरही आपल्यालाच शोधायला हवेे, म्हणूनच डायटपासून व्यायामापर्यंतची संपूर्ण जबाबदारीहीआपलीच ठरते, एवढी एक बाब ध्यानात ठेवली तरी पुरेसे आहे... लठ्ठपणाच कशाला, आयुष्यातल्या प्रत्येकच विवंचनेला हेच सूत्र लागू व्हायला हवे ना!
 

रेडिओवरच्या कुठल्याशा एका खाजगी वाहिनीवर, सध्या चित्रपट दिग्दर्शक करण जोहर लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देतोय्‌. आता त्याचा जनसमस्यांशी काय संबंध? पण, अक्षरश: पाऊस बरसतोय्प्रश्नांचा. ‘‘मी एका मुलीवर प्रेम करतो, पण ती भावच देत नाही,’’ इथपासून तर ‘‘ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे, त्या माझ्या मित्राला वाढदिवसानिमित्त काय गिफ्ट देऊ?’’ इथपर्यंतचेलाखमोलाचेप्रश्न देशाच्या कानाकोपर्यातून विचारले जाताहेत. तोही बेटा उत्तर देतोय्प्रत्येक प्रश्नाला-अगदी सर्वज्ञ, तज्ज्ञ असल्यासारखा! अर्थात, एक प्रायोजित कार्यक्रम आहे तो शेवटी. कार्यक्रमात विचारण्यासाठी प्रश्न खरोखरीच येतात दूरदुरून की निर्मात्याच्याच कल्पनेचा खेळ असतो सारा, कोण जाणे! पण, श्रोते कान देऊन ऐकतात हा खोट्या खोट्या प्रश्नोत्तराचा खराखुरा कार्यक्रम! का, ठाऊक आहे? कारण आमच्या समस्यांच्या उत्तरांसाठी दुसर्याकडे आस लावून बसण्याची सवय लागली आहे आम्हाला.

 

कालपरत्वे कधी भाजपाचा, तर कधी कॉंग्रेसचा असला, तरी महागाईच्या मुद्यावर निघणारा प्रत्येक मोर्चाविरोधी पक्षाचाअसतो या देशात. समस्याआमचीअसली तरी मोर्चा आमचा नसतोच. कारण आमची समस्या सोडवण्यासाठी मोर्चेत्यांनीकाढणे, हेच आम्हाला अपेक्षित असते. मी कुठेतरी नोकरी करतो. चार पैसे कमावतो. माझ्या घरात सुविधा हवी म्हणून मी गॅस सिलेंडर विकत घेतलेले असते. त्यावर स्वयंपाक माझ्या घरातील सदस्यांसाठी शिजणार असतो. शेजार्यापाजार्यांचा त्याच्याशी कडीचाही संबंध नसतो. सरकारचा तर दूरान्वयेही नसतो. पण, त्याच गॅस सिलेंडरसाठीची सब्सिडी मात्र मला सरकारकडून हवी असते. सब्सिडीची राशी जराशीही कमी-जास्त झाली की माझी ओरड सुरू होते. आदळआपट सुरू होते. मी माझ्या घरी, माझ्या कुटुंबीयांकरिताच्या स्वयंपाकासाठी वापरतो त्या सिलेंडसाठीचे पैसे सरकारने का भरावे, हा प्रश्नही माझ्या मनात निर्माण होत नाही. उलट, ती सरकारची जबाबदारीच असल्याच्या थाटातली माझी भूमिका असते. माझा थयथयाट त्यातूनच साकारलेला असतो. आपले प्रॉब्लेम्स दुसर्यांनीच सोडवायचे आहेत, याच मासिकतेचाही खरंतर तो परिणाम असतो!

 

या देशातल्या नागरिकांना सुरुवातीपासूनच ही सवय जाणीवपूर्वक लावण्यात आली आहे. विशेषत: स्वातंत्र्योत्तर काळात तर ही भावना अगदी जाणीवपूर्वक जपण्यात आली. लोकांनी फक्त एक मत देऊनआम्हालासत्ता सोपवायची. बाकी सगळं आम्ही पाहून घेऊ. तुमच्या घरासमोरची नाली स्वच्छ करण्यापासून, तर राज्यात मोठमोठी धरणं बांधण्यापर्यंत... सारंकाही सरकार करेल. याच भूमिकेतून तत्कालीन राज्यकर्त्यांनी लोकांची मानसिकता तयार केली. परिणाम असा की, इथे फक्तमतदारतेवढे शिल्लक राहिले. जबाबदारनागरिकांचीमात्र वानवा झाली. दुर्दैव असे की, त्याचे कुणाला शल्यही नाही. नागरिक सर्वार्थाने जबाबदार झाले, ते जबाबदारीने वागू लागले, तर अर्ध्या समस्या निकाली निघतील इथल्या. पण नेमकेतेचघडू नये, यासाठीची तजवीज वर्षानुवर्षे झाली. परिणाम असा की, छोट्या छोट्या गोष्टींसाठी सरकारदरबारी हात पसरणार्या परावलंबी, हतबल, दुर्बळ अशानागरिकनावाच्या घटकाची गर्दी जमली सगळीकडे. ना स्वाभिमानाचे कुठे दर्शन, ना स्बळावर, स्वकर्तृत्वातून काही घडवून आणण्याची धमक कुठे दिसत! स्वत:च्या हक्काबाबतही भीक मागण्याचीच सवय जडलीय्लोकांना त्यामुळे. कर्तव्याची जाणीव करून द्यायलाही मग कुणाची तरी गरज पडली नसती तरच नवल! अहो, स्वत:चे घर अन्घरासमोरचा थोडासा परिसर स्वच्छ ठेवा, हे सांगायलाही एकमोदीलागतो या देशातल्या नागरिकांना!

 

स्वत:चा राजकीय स्वार्थ साधण्यासाठी लोकांना मानसिकदृष्ट्या अपंग बनविण्याचीत्या वेळीअंमलात आलेली क्लृप्ती पुरेशी यशस्वी ठरली. कालौघात तीच परिपाठी बनली. काही कळायच्या आत लोकगुलामझाले. इतके की, रस्त्याच्या कडेला पोपट घेऊन धंदा मांडून बसलेल्या कथित ज्योतिष्यासमोरही लोक स्वत:चा हात दाखवण्यासाठी ताटकळू लागले. आपल्या भविष्याची  चिंता त्याच्यासमोर मांडू लागले. आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या हा पोपट अन्तो करण जोहर कसा सोडवू शकेल, त्याची उत्तरं हे लोक कसे देऊ शकतील, असा साधा प्रश्नदेखील कुणाच्याच मनाला सतावीत नाही इथे. स्वत:च्या शक्तीवरचा विश्वासही डळमळीत होत चाललाय्लोकांचा. म्हणूनच आधार देण्याची भाषा बोलणारा माणूस जरा कुठे गवसला की, त्याला देवत्व बहाल करून, आपला सारा भार त्याच्या स्वाधीन करून स्वत: मोकळे होण्याचा सोपा मार्ग निवडताहेत लोक आताशा. बहुधा म्हणूनच लोकांची फसगत करणार्या आसारामबापूसारख्या लोकांची पैदास वाढली आहे अलीकडे. बरं, हे दुर्बळ लोक हुशार एवढे की, त्यांना आसारामबापूने आपल्याला फसविल्याचा राग येतो लागलीच... आपणच त्याला देव बनवून मोठं केलं, याचा मात्र विसर पडतो प्रत्येकालाच. एखाद्या, अत्यंत जवळच्या नातेवाईकाला दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर रुग्णाचे भवितव्य तिथल्या डॉक्टरच्या स्वाधीन करतानाची हतबलता निदान समजण्यासारखी तरी आहे. कारण त्या वेळी, त्यापलीकडे काही करणे हातात नसते कुणाच्याच. पण, दर दिवशी आयुष्यातही तसंच वागताहेत ना सारे! त्याचं समर्थन कसं करायचं?

 

आम्ही फक्त गंगा प्रदूषित करणार, ती स्वच्छ करण्याची जबाबदारी सरकारची. आमच्या घरातले संडास बांधायलाही सरकारनेच पैसे द्यावेत अन्सरकारी पैशातून उभारल्या गेलेल्या सार्वजनिक मुतार्यांच्या स्वच्छतेची जबाबदारीही प्रशासनानेच पार पाडावी. त्या घाण कशा होतील, एवढं फक्त आम्ही बघू. आम्ही केलेली घाण स्वच्छ केली नाही म्हणून व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडण्यातही पुढाकार आमचाच असेल. मतदानाच्या दिवशी मतदान केले की जबाबदारी संपली. आता पुढचं सगळंकाही सरकारनं करावं... या केवळ भोळ्या लोकांच्या भाबड्या अपेक्षा राहिलेल्या नाहीत आता. ती मानसिकता झाली आहे- तुमची-माझी-सर्वांची. विशेषत: व्यवस्थासार्वजनिकअसेल, तर मग तर विचारायलाच नको. रेल्वेगाडी असो, एसटी स्टॅण्ड असो, की सार्वजनिक प्रसाधनगृह. कुणीच वाली नसतो त्याचा. एकच ध्येय. सर्वांनी मिळून ती व्यवस्था विसकळीत करायची. बस्स! सुरळीत करण्याची जबाबदारी घेईल कुणीतरी दुसराच स्वत:च्या खांद्यावर.

 

फिरायला, मौज करायला, खिशातले पैसे खर्च करून आलेल्या पर्यटकांनी एका प्रसिद्ध जंगलाच्या परिसरात करून ठेवलेला कचरा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर मोहीम राबवून स्वच्छ केला, एका संस्थेने. मग काय, टाळ्या पिटल्या लोकांनी. हो! तेवढं मात्र जमते बरं पब्लिकला! कामं दुसरेच करताहेत म्हटल्यावर कुणाच्या बाचं काय जाते? तेच तर पाहिजे आहे इथे प्रत्येकाला. जबाबदारीचे ओझेआपल्याखांद्यावर नको, बस्स! आपले असले तरी ते ओझे वाहून नेणारे खांदे इतरांचे असावेत, याची खबरदारी घेतच असतात लोक. कारण, यातले सारेच प्रश्नमाझेअसले, तरी ते सोडविण्याची जबाबदारी कुठेमाझीआहे? ती तर दुसर्यांनीच वाहायची आहे ना! हो! लहानपणापासून हीच तर परिपाठी अंगवळणी पडली आहे समाजाच्या. यांच्या प्रश्नावर तलवारी उपसून लढायचे ते इतरांनी अन्हे बघणार तो तमाशा...! माझे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी दुसर्याने का स्वीकारायची, हा प्रश्न गौण ठरतोय्या ओघात...

 
 
@@AUTHORINFO_V1@@