अखेर ‘त्या’ 168 शिक्षकांना मान्यता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Oct-2018
Total Views |


 


ठाणे : जिल्ह्यातील शाळांमध्ये तब्बल सात ते आठ वर्षांपासून बिनपगारी अध्यापनाचे कार्य करणाऱ्या 168 शिक्षकांच्या मान्यतेचा तिढा सुटला असून, जिल्हा परिषदेने शालार्थ आयडी मिळण्यासाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आ. निरंजन डावखरे यांच्या प्रयत्नानंतर रखडलेले मान्यतेचे प्रस्ताव मार्गी लागत आहेत.

 

राज्य सरकारने दि. 2 मे 2012 रोजी शिक्षक भरतीवर घातलेली बंदी दि. 20 जून, 2014 रोजी उठविली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. या समितीकडून शिक्षकांच्या पदांना मान्यता देण्यात येणार होती. मात्र, या समितीची बैठक झाली नाही.

 
दरम्यानच्या काळात, राज्य सरकारच्या विविध अध्यादेशानुसार वा न्यायालयाच्या आदेशानुसार 168 शिक्षकांना मान्यता देण्यात आली. या शिक्षकांचे प्रस्ताव शालार्थ आयडी मिळविण्यासाठी पुणे येथील विशेष कृती दलाकडे पाठविण्यात येणार होते. परंतु, त्याचवेळी काही पदांना नियमबाह्य मान्यता दिली असल्याचा संशय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने व्यक्त केला. या शिक्षकांनी अखेर शिक्षकांच्या मान्यतेचे सर्व 168 प्रस्ताव शालार्थ आयडी मिळविण्यासाठी पुणे येथे शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला.
 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/
@@AUTHORINFO_V1@@