आज रिलीज झालेत 'हे' चित्रपट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Oct-2018
Total Views |


 

 

मुंबई : या आठवड्यात अंधाधून, लवयात्री, नोटा, बॉईज २ चित्रपट रिलीज झाले आहेत. वेगवेगळ्या चवीच्या प्रेक्षकांना वेगवेगळे सिनेमे चाखायला मिळणार आहेत. तर मराठीतील सुपरहिट ठरलेल्या बॉईज चित्रपटाचा पुढचा सिक्वेल आज रिलीज होतोय. अंधाधून, लवयात्री, नोटा हे चित्रपट देखील गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिले जात आहेत. त्यामुळे नेमका कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो हे लवकरच कळेल.

 
 

अंधाधून

आयुषमान खुराना, राधिका आपटे, तब्बू, छाया कदम यांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. ते थरार आणि गूढ कथांसाठी ओळखले जातात. त्याच आशयाचा हा चित्रपट आहे.

 
 

लवयात्री

सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा आणि वरीना हुसैन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट आहे. नवरात्रीच्या नऊ दिवस आणि नऊ रात्रीत घडणारी प्रेमकथा या चित्रपटातून दाखवली आहे. अभिराज मीनावाला यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 
 
 

बॉईज २

बॉईजच्या घवघवीत यशानंतर बॉईज २ रिलीज झाला आहे. अर्थातच ढुंग्या, धैर्या आणि कबीर यांची शाळेची मस्ती कॉलेजमध्ये पण दंगा घालणारी आहे. विशाल देवरुखकर यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून सुमंत शिंदे, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, ओंकार भोजणे, सायली पाटील, यतीन कार्येकर, गिरीश कुलकर्णी आणि पल्लवी पाटील हे मुख्य भूमिकेत आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@